Introduction
हिमालयन ओडिसी
10 वर्षांपेक्षा जास्त झाले असतील, इंडिया आर्ट गॅलरीचे संस्थापक, श्री. मिलिंद साठे यांनी हिमालय बाबतच्या
चित्रांची मालिका तयार करण्याविषयी ज्येष्ठ कलाकार श्री. किशोर रणदिवे यांना सुचविले होते. मिलिंद साठे यांना
हिमालय प्रदेशात दीर्घ काळ कार्य केलेल्या थोर रशियन रंगकर्मी निकोलस रोएरिच यांच्या चित्रांचे मोठे आकर्षण
वाटत होते. निकोलस रोएरिच यांची रंगकला/पेन्टिंग्स जगभरातील गौरवशाली संग्रहालयांमधून प्रदर्शित झाली
आहेत.
यापाठोपाठ अतिशय विचार, प्रवास आणि प्रचंड प्रमाणात काम आलेच. श्री. किशोर रणदिवे व श्री. मिलिंद साठे
दोघांमध्ये स्पष्ट विचारविनिमय झाला की चित्रांमध्ये सर्व काही हिमालयाबाबत प्रदर्शित होणे आवश्यक आहे. ही
पर्वतमालिका भव्य आणि सुंदर आहे, या भूमीचे संरक्षक आहेत आणि तेथील संस्कृती व त्या देवाची देणगी आहेत.
10 वर्षांहून जास्त, श्री. किशोर रणदिवे यांनी हिमालय विषयावरील प्रचंड काम केले आहे आणि हा प्रवास असाच
चालू राहील. श्री. किशोर रणदिवे (जन्मः 1952) हे सर जे.जे स्कूल ऑफ आर्ट, मुंबईचे माजी विद्यार्थी. श्री. शंकर
पळशीकर आणि श्री. जी.एस हळदणकर यांच्यासारखे वैशिष्ट्यपूर्ण गुरु त्यांना लाभले हे त्यांचे सद्भाग्य. त्यांच्या
1972 मधील पहिल्या प्रदर्शनापासून गेली 48 वर्षे ते रंगचित्रकाम करीत आहेत.
या प्रदर्शनात प्रदर्शित केलेली सर्व रंगचित्रे श्री. किशोर रणदिवे यांनी कॅनव्हासवर तैल-माध्यम वापरून केलेली
आहेत.
इस प्रदर्शनीमें प्रदर्शित रंगचित्रकारी के लिये श्री. किशोर रणदिवे इन्होंने कैनव्हासपर तैल-रंगोंके साथ काम
किया है।