इंडिया आर्ट गॅलरी, पुणे-२१ जुलै ते १२ ऑगस्ट २०१८
खुला आसमान हे मुलांच्या सर्जनशील अविष्कारासाठी विनामूल्य व्यासपीठ आहे. खुला आसमान मुलांसाठी स्पर्धा आयोजन करते. प्रत्येक तीन महिन्यांनी, निवडक चित्रांची यादी केली जाते आणि खुला आसमान प्रत्येक निवडलेल्या मुलासाठी स्वतंत्र वेब पेज तयार करते. हे स्वतंत्र वेबपेज पुढील तीन वर्षांसाठी संभाळले जाते. निवडलेल्या गेलेल्या चित्रांचे पुन्हा दुसऱ्या फेरीत जजिंग करुन पदके ठरवली जातात.
खुला आसमान तिमाही स्पर्धेत ज्या पुण्यातील मुलांना सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके मिळाली आहेत, त्या मुलांच्या चित्रांचे हे प्रदर्शन आहे. खुला आसमान संपूर्ण भारतभर पदक प्राप्त चित्रांचे प्रदर्शन करेल.
खुला आसमान हे प्रदर्शन बघण्यासाठी शाळेतील मुले, युवक, पालक आणि शिक्षक यांना आमंत्रित करते. हे प्रदर्शन बघुन मुलांना नक्कीच अभिव्यक्त होण्याची प्रेरणा मिळेल. गॅलरीत येऊन, चित्रे काढून व रंगवून खुला आसमानच्या चालू स्पर्धेत ते चित्र समाविष्ट करता येऊ शकेल.
स्थळ : इंडिया आर्ट गॅलरी
‘लावण्य’ प्लॉट नं. ३०, भोसले नगर,
ऑफ रेंज हिल्स रोड, पुणे-४११००७