Suryasudha, painting by Young Artist Manali Bagade View Portfolio icon Share Facebook Twitter Whats App Pinterest Description -- Art Number 26523 Artwork Title Suryasudha Artist Name Manali Bagade Medium Acrylic on Canvas board Size 33 x 24 inches (83.82 x 60.96 cm) Information पृथ्वी जणू सूर्याच्या प्रेमात आहे आणि म्हणून ती त्याच्या कक्षेत युगानुयुगे फिरत आहे. सूर्याकडे प्रितीची याचना करत करत ती आता तरुण राहिली नाही. जवानीची आग संपली पण प्रितीची ज्योत अजूनही तेवत आहे. कुसुमाग्रजांनी साकारलेलं हे शब्दचित्र फार आवडलं. मला अस वाटतं की एवढी युगे सूर्यावर आपले सर्व ध्यान एकावटणारी सुधा विचारांनी मात्र परिपक्व झाली आहे. कुसुमाग्रजांच्या पृथ्वी चे अंतरंग पुन्हा नव्याने नटले. जिला सूर्य आधी मित्र, प्रियकर वाटायचा आता तोच तिला ईश्वर वाटतो. ज्याच्या सोबतीने तिचे मन चंचल व्हायचे तो तिला आज प्रेरणा देतो आणि अखंड ऊर्जा निर्माण करण्याची ताकतही. सूर्य मात्र स्वतःमध्ये लीन आणि डोळे मिटून थांबलेला. न जाणे काय सांगतो तिला. विज्ञान सांगते की सूर्याच्या पृष्ठभागावर जेवढे तापमान आहे तेवढेच पृथ्वीच्या गाभ्याचेही. कदाचित स्वतः ध्यानस्थ होवून हेच तर नसेल ना सांगत की तू सुध्दा सूर्य हो. पण तिला मात्र हे उमजतच नाहीये. कारण ती अजूनही सुर्याकडेच बघतेय. तिला सूर्याकडे जायचे आहे पण भीती वाटते सूर्याच्या उष्णतेने तिचे सर्वांग राख होईल याची. तीच अस्तित्व संपेल याची. म्हणून ती त्याच एका कक्षेत फिरते. तिचं प्रेम आणि भक्ती मात्र वाढत आहे. एक दिवस नक्कीच ती स्वतःमध्ये बघायला सुरवात करेल. तिला सूर्याकडे बघून जितकी ऊर्जा मिळते तेवढीच स्वतःच्या अंतरंगी पण मिळेल. तिला उमजेल की ज्या सूर्यावर आपण प्रेम करतो तो तर आपल्याच अंतरंगी आहे. आपण स्वतः सूर्य आहोत याची जाणीव तिची सर्व चिंता दूर करेल. आपल्या देहाची राख होण्याची भीती तिला क्षुल्लक वाटेल आणि ती सूर्य म्हणूनच सूर्याला आलिंगन देईल. सूर्यमध्ये विलीन होईल सूर्यसुधा म्हणून...