Learn how to do nature painting and landscape painting in this painting tutorial video. शिका निसर्ग चित्र व्हिडिओ.
Oil pastel colours have been used for this painting.
निसर्ग हा आपला गुरु आहे. निसर्गाकडून आपण खूप काही गोष्टी शिकत असतो.
निसर्ग सौन्दर्य पाहून कवींना कविता सुचतात, वादकाला नवनवीन संगीत सुचते आणि चित्रकार त्याच्या सुंदर रंगानी निसर्गसौन्दर्य चित्रित करत असतो.
या व्हिडिओमध्ये असेच एक निसर्गचित्र काढून दाखवले आहे.
आकाश, ढग, सूचिपर्णी वृक्ष, त्यापुढील पिवळ्या फुलांचे शेत या गोष्टी या निसर्गचित्रात दाखवल्या आहेत. पेन्सिलीने अगदी थोडक्यात चित्रण कसे करावे, रंग कसे निवडावेत, तैलखडूंच्या विविध छटा कशा तयार कराव्यात, त्यांचे एकमेकात मिश्रण कसे करावे, कापूस वापरून फिका रंग कसा तयार करावा हे या व्हिडिओत पाहायला मिळते.
हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही निसर्गचित्र काढावेसे वाटेल. तुमच्या आजूबाजूला दिसणारा निसर्ग न्याहाळा आणि जरूर वेगवेगळी अनेक चित्रे काढा. सराव करा. सतत सराव करणे हा शिकण्याचा एक उत्तम मार्ग आहे.