या व्हिडिओमध्ये प्राथमिक रंग व दुय्यम रंग याबद्दल माहिती दिली आहे. यासाठी तैल खडू वापरले आहेत.
This video has been created to explain the concepts of primary colours, secondary colours and colour wheel. Oil pastels have been used to explain these concepts.
प्राथमिक रंग | Primary Colours
प्राथमिक रंग - पिवळा , निळा, लाल . हे तीन रंग इतर कोणत्याही रंगांच्या मिश्रणातून तयार होऊ शकत नाहीत. हे रंग आपल्याकडे असावेच लागतात. म्हणून यांना प्राथमिक रंग असे म्हणतात. या तीन रंगांच्या मिश्रणातून जे रंग तयार होतात त्यांना दुय्यम रंग असे म्हणतात.
Primary Colours are blue, red and yellow. These colours cannot be created by mixing any other colours. It is this reason that they are called as primary colours. Secondary colours are created by mixing these three colours.
दुय्यम रंग | Secondary Colours
दुय्यम रंग - केशरी, हिरवा, जांभळा
पिवळा + लाल = केशरी
पिवळा + निळा = हिरवा
निळा + लाल = जांभळा
फिका केशरी रंग तयार करण्यासाठी पिवळा रंग जास्त व लाल रंग कमी घेऊन त्यांचे मिश्रण करावे .
फिका हिरवा रंग तयार करण्यासाठी पिवळा रंग जास्त व निळा रंग कमी घेऊन त्यांचे मिश्रण करावे .
फिका जांभळा रंग तयार करण्यासाठी लाल रंग व निळा रंग कमी दाब देऊन लावावा व त्यांचे मिश्रण करावे .
रंगचक्र | Colour Wheel
यानंतर रंगचक्र काढून दाखवले आहे. यात तीन प्राथमिक व तीन दुय्यम रंग आहेत. याशिवाय आपण दुय्यम रंगांच्या अनेक छटा तयार करू शकतो. या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही अनेक नवीन रंगछटा तयार करून पहा. नवनवीन रंगछटा वापरून चित्र रंगवा.