Meera Bai
Silver medal in Khula Aasmaan national students painting contest
Art No
:
22460
Artist
:
Tushar Sakpal
Title
:
Meera Bai
Medium
:
Paper Collage on Cardboard
Size
:
11.69 x 8.27 inches (29.6926 x 21.0058 cm)
Price
:
Rs. 8,400 ($114)
शाळेत चित्रकलेच्या विषयामध्ये एकदा 'कोलाज पेंटिंग' शिकवली होती. मला अजुनही लक्षात आहे मी माशाचे कोलाज पेंटिंग छान बनवले होते. नंतर कॉलेजमध्ये मला खासकरून राधाकृष्ण आणि मीराबाई यांची चित्रे आवडायला लागली. मला मीराबाईंचे चित्र काढायचे होते. ते वेगळे असावे असे मला वाटले. त्यामुळे मी कोलाज पेंटिंग बनवायचे ठरवले. कॉलेजमध्येच मोकळ्या वेळेत मी थोडीशी सुरवात केली. माझ्या मते कोलाज काम हे कठिण नाही. फक्त त्याला थोडा जास्त वेळ लागतो. मला परिपूर्ण कोलाज पेंटिंग बनवायचे होते. त्यामुळे मी घाई न करता रोज थोडे थोडे बनवून ते पूर्ण केले. मी त्यामध्ये शीत रंग योजना (cool colour scheme) वापरली. पांढरी साडी आणि तिच्या छटा दाखवणे थोडे अवघड होते पण ते जमून गेले. आणि अखेर माझ्या मनासारखे कोलाज पेंटिंग माझ्याकडून पूर्ण झाले.
See the video about this artwork
Listen to the audio about this artwork
Other artworks from this artist
-
Acrylic on Canvas0 x 0 inches
(0 x 0 cm) -
Mixed Media on Cardboard0 x 0 inches
(0 x 0 cm) -
Pen on Paper8.27 x 11.69 inches
(21.0058 x 29.6926 cm)Rs. 4,000 ($54)