मराठी
हिंदी

Home » Khula Aasmaan » Khula Aasmaan Science » Little Scientists » Essay by Saee Deshmukh

If I were on Mars, science fiction essay by Saee Deshmukh

Saee Deshmukh, Podar International School, Parbhani from Maharashtra

Shortlisted essay from Khula Aasmaan essay writing competition for children

Science essay by Saee Deshmukh, class 5, Podar International School, Parbhani

This science fiction essay was part of the shortlist in the essay writing competition organised by Khula Aasmaan and Science Park, Pune to celebrate Science Day 2019.

पृथ्वीवर होणारी मानवाची, इमारतीची, वाहनाची गर्दी पाहता-पाहता मनात असा विचार आला की निवांत, शांत रहायचे असेल तर आता दुसऱ्या ग्रहावरच जावे लागेल. कोणत्या बरं ग्रहावर जावे अं... चंद्र ? नको, तिथे ना हवा ना पाणी ना गुरुत्वाकर्षण मगं हं. परवाच पेपर मध्ये वाचले की भविष्यातील माणसे मंगळावर राहू शकतील.

खरंच ! मी जर मंगळावर असते तर काय बरं झाले असते. तिथे कशी राहिले असते ? त्यासाठी मला मंगळ व पृथ्वी मध्ये काय साम्य आहे हे पहायला हवे, तिथे राहण्यासाठी पृथ्वी सारखे वातावरण तयार करावे लागेल. असे ऐकले होते की मंगळावर पाणी असल्याचा पुरावा होता चला म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला पण हे पाणी पिण्यायोग्य आहे का, तिथे जेवणाची सोय काय? म्हणजे तिथे शेती करता येईल काय ? प्रश्न, प्रश्न आणि नुसते प्रश्न.

कोणतेही प्रश्न नुसते विचार करुन सुटत नसतात. मगं काय मंगळ यानासाठी नासाने तयार केलेले यान काढले आणि गेले जूऽऽ.... जूऽऽ.... मंगळावर.

मी मंगळावर पोहोचले त्यावेळी बहुदा रात्र झाली असावी कारण सगळीकडे अंधार दिसत होता. सहज म्हणून आकाशाकडे पाहिले तर अरे मंगळावरचा चंद्र असा कसा ? असा कसा म्हणजे ओबड-धोबड आकाराचा सांगता येत नव्हता. आपला चांदोमामा कसा गोल सुंदर दिसतो ना तसा हा अजिबात नाही आहे. अरे इथे तर दोन चंद्र दिसत आहेत. काय बरं याचे नाव ? हं... आठवले फोबस आणि डिमोस.

मंगळावर मी पोहोचले तर खरे, पण इथे रहायचे कसे ? म्हंटल चला उद्या सकाळी यावर विचार करावा. आता सध्या तर खूप झोप येतेय. यानामध्ये जावून मी मस्त ताणून दिली.

दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आली ती आईच्या आवाजाने किंवा पक्षाच्या किलकिलाटाने नव्हे तर प्रखर सुर्यप्रकाशाने. मगं आठवले अरे हो, आपण तर मंगळावर आहोत. इथे पृथ्वी सारखा ओझोनचा थर नसल्यामुळे सुर्यप्रकाश सरळ इथे येतो त्यामुळे तो इतका प्रखर आहे. हा पण सौर उर्जेसाठी याचा चांगला वापर करता येईल.

डोळे चोळत ऑक्सिजन मास्क चढवला व यानाच्या बाहेर आले. मनगटावरील चीप ने लगेच रंग बदलला हं... म्हणजे इथे खूप मोठ्या प्रमाणावर कार्बनडाय ऑक्साईड आहे. अरे थोडासा प्राणवायू सुद्धा आहे की, लाल रंगाचा मंगळ पाहून मला रागाने लाल होणाऱ्या दादाची आठवण झाली.

घड्याळात पाहिले सकाळचे नऊ वाजले होते. केलॉग्ज खावून म्हंटल मंगळाभोवती एक चक्कर मारुन यावं. चक्कर मारताना जाणवले मंगळाचा स्वत:भोवती फिरण्याचा अक्षही पृथ्वीप्रमाणेच केलेला असल्याने इथेही पृथ्वीप्रमाणे ऋतु असणार. अरे प्रदक्षिणा झाली सुद्धा. पृथ्वी प्रदक्षिणेला जेवढा वेळ लागतो ज्याचाने अर्ध्याच वेळात हां हां पृथ्वी पेक्षा अर्ध्या आकाराचा असला पाहिजे.

आता मंगळावर रहायचे तर तिथे घर बांधावे लागणार. ती सुद्धा मॉड्यूलर प्रकारची. इथे शेती करायची तर माती विरहीत त्यासाठी काहीतरी पद्धत शोधावी लागेल. इथे कार्टुन चॅनल चालू राहण्यासाठी सौर उर्जेचा वापर करावा लागेल. बाप रे ! बरीच मोठी प्रोसिजर आहे. कमीत कमी पन्नास-साठ वर्ष लागतील.

खूप-खूप फिरुन मी कंटाळून गेले. भूक ही प्रचंड लागली होती. मला आठवले आजी म्हणते मंगळ हा अशुभ ग्रह आहे. पत्रिकेतील मंगळ ग्रहाचा अनेकांनी धसका घेतलेला असतात. मंगळ योग पत्रिकेत आला की तो तूमची वाट लावतो बाप रे !

आई म्हणते हा म्हणते हा मंगळ ४०० मिलीयन किलोमीटर पृथ्वी पासून लांब आहे. तिथूनही तो फक्त आपल्या भारतीयांच्या पत्रिकेत हस्तक्षेप करतो. किती ही असहिष्णूता मंगळाची पृथ्वीच्या अर्ध्या आकाराचा असून सुद्धा त्याची ही हिम्मत आता तर मंगळावर स्वारी करावीच लागेल. त्यासाठी पृथ्वीवर जावून बरीच तयारी करावी लागेल. चला तर मग जू... जूऽऽऽ....

“Khula Aasmaan” (meaning Open Sky) is a registered trademark which is owned by Link Indiaart.com Pvt. Ltd. (https://www.indiaart.com). Khula Aasmaan is a platform for creative expression by children and young adults. We have chosen “Khula Aasmaan” as the way to spell this as we believe that it is the phonetically most appropriate way to spell it. Khula Aasmaan may also be spelt as Khula Asmaan, Khula Asman, Khula Aasman.

Khula Aasmaan conducts art competitions and creates educational content in art and science for children and college students. Khula Aasmaan encourages the children and young adults to think independently and express themselves.