Home » Khula Aasmaan » Khula Aasmaan Science » Little Scientists » Essay by Jyoti Sawant
Kitchen Science, essay by Jyoti Sawant
Shortlisted science essay from Khula Aasmaan essay competition for children
Essay by Little Scientist Jyoti Sawant, class 7, Gopalkrishna Vidyalaya, Gondavale Khurd, Dist. Satara, Maharashtra
This science essay was part of the shortlist from Science Day essay contest for children.
This children's essay contest was organised by Khula Aasmaan and Science Park, Pune.
आजकालच्या आधुनिक आणि तंत्रज्ञान प्रिय जगात खरोखरच स्वयंपाक घरातील इंधन बचत ही काळाची गरज आहे या निबंधामध्ये पाहणार आहोत.
स्वयंपाक घरातील इंधन बचत ही काळाची गरज आहे. इंधनाचे तीन प्रकार आहेत. घनरुप, वायुरुप, द्रवरुप असे तीन प्रकार आहेत. आपल्या देशातील इंधनाच्या साठयाचे प्रमाण मर्यादित असल्यामुळे आपण सर्वांनीच मिळून बचत केली पाहिजे. जमिनीखालून महणजेच खाणीतून तेल मिळते. त्यावर प्रक्रिया करुन वेगवेगळया प्रकारचे इंधन बनवले जाते.
इंधन म्हणजे असा एक पदार्थ आहे की, ज्याच्या ज्वलनाने किंवा हालचालींमुळे उष्णता मिळविण्यासाठी उपयुक्त अशी उर्जा मिळते. पेट्रोल व डिझेल ही द्रवरुप इंधने आहेत. कोळसा हे घनरुप इंधन आहे. इतर देशांच्या तुलनेत आपल्या भारतात इंधनाचा साठा कमी असल्यामुळे आपल्याला इतर भागातून इंधनाची आयात करावी लागते.
पेट्रोल, डिझेल या सारख्या इंधनाची निर्मिती करणे निश्चितच आपल्या हातात नाही. मात्र त्या इंधनाची आपण नक्कीच बचत करु शकतो. आपली बचत म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीची बचत होईल. ही जाणीव प्रत्येकात निर्माण होणे आवश्यक आहे.
इंधन बचत करताना प्रथम आपण आपल्या घरातील विजेची बचत केली पाहिजे. टी.व्ही., एसी, लाईटस, पंखे यांचा वापर करताना काळजी घेतली पाहिजे. विनाकारण जर आपण या वस्तू चालू ठेवल्या तर वीज वाया जाईल.
घरगुती सिलेंडरचा वापर योग्य त्या रितीने केला पाहिजे. त्याप्रत्येक ग्यासची बचत होईल. अन्न शिजवताना पातेल्यात किंवा एका भांडयात न शिजवता जास्तीत जास्त प्रेशर कुकरचा वापर केला पाहिजे. त्यामुळे ग्यासची बचत होईल. स्वयंपाक करताना प्रथम पूर्ण तयारी करुन मगच स्वयंपाक केला पाहिजे.
इंधन बचे तो प्राण बचे ।
गॅस बचतीचे उपाय
1. गॅसवर काहीही बनविण्यापूर्वी आवश्यक सामग्रीची अगोदरच तयारी करुन ठेवणे. यामुळे गॅस आणि वेळ दोन्हींची बचत होईल.
2. प्रेशर कुकरचा जास्तीत जास्त वापर करणे, प्रेशर कुकरमध्ये वस्तू लवकर शिजतात आणि गॅसची बचत होते.
3. चहा किंवा पाणी सारखे सारखे उकळल्याने गॅस वाया जातो.त्यासाठी चहा किंवा पाणी एकदाच उकळून फ्लास्कमध्ये ठेवावे.
4. पाणी गरम करण्यासाठी गॅस ऐवजी ईलेक्ट्रीक वॉटर हिटर वापरावा.
5. ग्रील्ड फुड बनविण्यासाठी गॅसचा वापर न करता ओव्हन वापरावा.
6. गॅसचा रेग्युलेटर, पाईप, बर्नर नियमित तपासा.
7. गॅस लिक असल्यास लगेच दुरुस्ती करा.
8. गॅसची नियमित सर्विसिंग करुन घ्या.
वरील सर्व गोष्टींची काळजी घेतल्यास तुमच्या गॅसची २५% बचत नक्कीच होईल. पेट्रोलियम पदार्थांच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण नाही आहोत. आपली ही गरज भागविण्यासाठी आपल्याला दुसर्या देशांवर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे हे छोटे छोटे आखाती देश त्यांच्या ईशार्यावर संपूर्ण जगाला नाचवत आहेत. आज अमेरिकेसारखी महासत्ता देखील मुद्रा आज कच्चा तेलाच्या खरेदीवर खर्च होत आहे. आज शेअर बाजारातील निर्देशांकडे क्रुड ऑईलच्या किमतीवर अवलंबून असतात. शेवटी हे तेलसाठे नैसर्गिक आहेत. ते कधी ना कधी संपणारच.
बचतीचे दीप लावूया
जीवन समृद्ध करुया
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आयसिस सारख्या आतंकवादी संघटनांमुळे हे तेलसाठे देखील नष्ट होत चालले आहेत. उदया एक परिस्थिती अशी येणार आहे कि आपल्याला पाणी वाचवा प्रमाणेच तेल, वाचवा, गॅस वाचवा असे म्हणत फिरावे लागणार आहे.यापैकी गॅसचे महत्व खूप आहे. गावापासून शहरापर्यंत आज घरात जेवण बनविण्यासाठी गॅस अतिआवश्यक झाला आहे. वाढत्या महागाईमुळे तर लोकांचे अधिकच कंबरडे मोडले आहे आणि अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर काय होईल याचा विचारच न केलेलाच बरा. भविष्यात येणार्या पाहणार्या या अडचणींवर आपण काही मात करु शकतो आणि यात आपलाच फायदा होणार आहे.
इंधन वाचवा, देश वाचवा.
जीवन आनंदी बनवा.
Khula Aasmaan conducts art competitions and creates educational content in art and science for children and college students. Khula Aasmaan encourages the children and young adults to think independently and express themselves.