Science Day essay contest
Khula Aasmaan Science
Science Essay competition to celebrate National Science Day
presented by Science Park & Khula Aasmaan
नाव : वैभवी विशाल शेलार
शाळा : बापुसाहेब पवार कन्याशाळा, पुणे
जन्म तारीख : १ सप्टेंबर २००६
मी विज्ञानाच्या व भूगोलाच्या पुस्तकात वाचले आहे की मंगळ हा ग्रह ‘लाल ग्रह’ या नावाने ओळखला जातो. मंगळाबद्दल माझी कल्पना मी व्यक्त करते. असे असते की, मंगळावर ऑक्सिजन असता तर ? किंवा मंगळावर माती असती तर ? असे खूप प्रश्न मला पडले. या प्रश्नांमध्ये मी गुंतून गेले होते. एकदा रात्री झोपल्यावर स्वप्नात मंगळ ग्रह आला. स्वप्नात नासा बरोबर मंगळावर गेले आहे आणि मंगळावर खरंच ऑक्सिजन आहे आणि माती पण आहे. आणि मंगळ हा पृथ्वीच्या व्यासापेक्षा अधिक आहे. मंगळावर माती असतेच. त्या मातीत पृथ्वीच्या मातीप्रमाणेच झाडे उगवण्याची क्षमता आहे का हे बघण्यासाठी मी आणि नासातील कर्मचार्यांनी मातीची नोंद केली आणि मंगळावरच्या मातीत लोह ऑक्साईड होते. त्यांनी सांगितले आपण इथे झाडे लावू शकतो आणि मंगळावर गुरुत्वाकर्षाणामुळे आपण चालू शकतो. आम्ही झाडे लावण्यासाठी बी मातीत टाकले. मी रोपाची व वृक्ष येण्याची वाट बघेपर्यंत नासानी खूप काही माहिती शोधली.
जसे की पृथ्वीप्रमाणेच मंगळाला चंद्र आहेत; पण मंगळाला दोन चंद्र आहेत. त्यांच्या नावांचीही मला माहिती मिळाली. एक चंद्र त्याचे नाव ' कोबोस ' आणि दुसरा ' डिम्रोज '. मला फार आनंद झाला आम्ही ही माहिती मिळवली म्हणून. इकडे सर्व असल्यामुळे एक वर्ष मंगळावर राहण्याचे निश्चित झाले व आम्ही रात्री दोन चंद्र पाहात झोप काढली. नंतर सकाळ झाली, आम्ही उठून पाहिले पृथ्वीच्या मातीप्रमाणे मंगळावरच्या मातीत रोप उगवले आणि आम्ही आनंदी झालो. दुसरा दिवस होता तोही मजेत गेला. तिसर्या दिवशी मात्र आणखी काही माहिती मिळतेय का हे पाहण्यासाठी आम्ही मंगळावर फिरत होतो. मंगळावर एक उंच डोंगर होता. तो खूप म्हणजे खूप उंच होता. नासा म्हणाले, ‘हा सूर्यमालेतील सर्वात उंच डोंगर आहे.’ मी चटकन् म्हणाले, ‘पण पृथ्वीवर ऐव्हरेस्ट उंच आहे.’ नासा म्हणाले, ‘या डोंगराचे नाव 'मेरीनर' आहे. एव्हरेस्टपेक्षाही कित्येक पटीने उंच आहे.’ मला आणखी माहिती मिळत होती. मी प्रत्येक माहितीची नोंद करत होते. आमच्या कॅम्पकडे आल्यावर पाहते तर काय, ते रोपटं लगेच झाड झालं. तेही फक्त चार दिवसांत. नासाही चकीत झाले. मंगळाच्या मातीत इतकी क्षमता आहे हे पाहून मीही चकीत झाले व आम्ही पृथ्वीप्रमाणेच झाड लावण्याची प्रक्रीया सुरू ठेवली. बघता बघता पाच वृक्ष झाले. आजचा आमचा विसावा दिवस होता. नासाच्या मनात विचार आला की इथे दिवस फार हळुवार जातायेत, मंगळावर पृथ्वीपेक्षा एक तास जास्त असतो असे मला नासानी सांगितले. मग मी म्हणाले, ‘पृथ्वीचा एक दिवस म्हणजे 24 तासांचा आणि एक तास जास्त म्हणजे..... मंगळावर एका दिवसासाठी 25 तास लागतात की काय ?’ ते म्हणाले, ‘हो.’ मी या माहितीची नोंद माझ्या डायरीत केली. नासांना आवडले की मी प्रत्येक माहितीची नोंद डायरीत करत आहे.
आजचा माझा मंगळावर पंचवीसावा दिवस. नासा म्हणाले, ‘आणखीन माहिती शोधण्यास येतेस ?’ मी त्यांच्या सोबत गेले. माझ्याबरोबर माझी मोठी बहिण होती. ती म्हणाली, ‘जाऊ या.’ मग आम्ही दोघीही त्यांच्या सोबत गेलो. आम्हाला काही हालचाल दिसली. आम्ही सावध झालो व हळुवार पावले टाकत चालायला सुरुवात केली. तिथे हिरव्या रंगाचे एलियन होते. त्यांनी तर काही इजा पोहचवली नाही. या उलट मीच त्यांना मित्र बनवले. त्यांनी अत्यंत मेहनतीने शोधत होते. नासा सावध होेते. त्यांची विचित्र वेशभूषा पाहून आम्ही तेथून कॅम्पकडे येत होतो आणि आम्ही येत असताना आम्हाला अचानकच आवाज आला. आम्ही तिथे न जाता कॅम्पकडे गेलो. संध्याकाळ होत होती. अंधार पडून पुन्हा आकाशातील दोन चंद्र भेटीस आले. कॅम्पच्या ठिकाणी फक्त माती होती. त्या मातीत आम्ही झाडे उगवून पृथ्वीप्रमाणे जंगल केले. माहिती मिळाल्याप्रमाणे मंगळावरही ऋतु होतात असे समजले.
आम्हाला आता कळले की फक्त दोनच ऋतु होतात उन्हाळा व हिवाळा. पावसाळा कधी नव्हताच आणि झाडे लावल्यास पाऊस हा पडणार. पावसाचे पाणी साठवण्याचे ठरवले. नासाने पाच मिनिटांतच मोठा खड्डा खणला व पाणी साचून तलाव बनवला. पाऊस पडल्यामुळे तेथील हिरव्या रंगाच्या एलियनला पावसाचा अनुभव आवडला. कारण पहिला पाऊसच पडला नव्हता. पाऊस पडला की ते त्यांचे अप्रतिम नृत्य जणू आपले आदिवासी करतात अगदी तसेच. आम्ही दरवेळी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्यांची भाषा समजण्यासारखी नव्हती. तरी त्यांच्या भाषेतील काही शब्दांची नोंद केली. आम्ही हळूहळू त्यांची भाषा शिकत होतो. आम्ही आमच्या कॅम्पचा 50 दिवसांचा प्रवास करत होतो. पण मंगळ पृथ्वीपेक्षा दुप्पट असल्यामुळे फिरणे शक्य नव्हते.
आम्ही लगेचच कॅम्पकडे परतलो. थोडावेळ बसून आम्ही परत शोधास निघालो. मला असे झाले होते की आम्ही पूर्ण मंगळ फिरावा तरी ते शक्य नव्हते. नासांनी ते शक्य केलं. आम्ही संपूर्ण मंगळावर फिरत होतो. मंगळ फिरण्यास जास्त दिवस झाले. पृथ्वीवर येत असताना आम्हाला फार महत्त्वाचे कळाले की मंगळावरचा एक वर्ष पृथ्वीच्या दोन वर्षांच्या बरोबरचा होता. आम्ही पृथ्वीवर आलो व माझी झोपमोड झाली आणि कळाले हे तर स्वप्न होते. म्हणजे मी स्वप्न पाहत होते की काय..?