हिंदी
English

 

 

जिज्ञासा, सर्जनशीलता, अभिव्यक्ती व कल्‍पनाशक्‍ती

खुला आसमान

  • मुलांची कल्‍पनाशक्‍ती आणि सर्जनशीलता कलेच्‍या माध्यमातून खूप छान व्‍यक्‍त होऊ शकते. स्‍थानिक बुद्धिमत्ता ही नऊ बुद्धिमत्तांपैकी एक आहे. या बुद्धिमत्तेचा विकास करण्यासाठी भारतातील औपचारिक शिक्षणात फारसे काही केले जात नाही.
  • २१ व्‍या शतकातील मुलांसाठी महत्त्वाचे आणि अत्‍यावश्यक कौशल्‍य म्‍हणजे सांस्कृतिक साक्षरता. ही पायाभूत साक्षरता आणि सर्जनशीलता हीच महत्त्वाची योग्‍यता आहे. या दोन्‍ही गोष्टी वाढवण्यामध्ये कलेचे महत्त्वपूर्ण योगदान असते.
  • कला हीच समाजजीवनाचा आरसा असते आणि कलेतून समाजामधे बदल घडवून आणण्यास उत्तेजन मिळते. भारताला आपल्‍या कलाकारांची आवश्यकता आहे. ज्‍या मुलांना कलात्‍मक क्षमतेची देणगी मिळाली आहे. त्‍यांना त्‍यांची प्रतिभा विकसीत करण्यासाठी खूप कमी जागा उपलब्‍ध आहेत. अशी मुले माध्यमिक शाळेत असताना कलाविकास सोडून नोकरी मिळण्यासाठी आवश्यक असलेला अभ्यासक्रमच निवडतात.
  • निरीक्षण, जिज्ञासा, वैज्ञानिक विचार आणि सर्जनशीलता हे गुण असलेली तरुण मने तयार होतील. जी विज्ञानातील नवनवीन शोध लावून समस्या सोडवतील.

आम्‍ही यासाठी काहीतरी करायचे ठरवले आणि आम्‍ही खुला आसमान ची निर्मिती केली.

 

खुला आसमान हे मुलांसाठी नवीन व्‍यासपीठ आहे जे मुलांचे सर्जनशील विचार आणि नवीन उपक्रमांना प्रोत्‍साहन देते. खुला आसमान स्‍पर्धेत सहभागी व्‍हा. तुम्‍ही केलेले डुडल्‍स रेखाचित्रे, व्‍यंगचित्रे, रंगचित्रे नवीन कल्‍पना व इतर बरेच काही येथे सबमिट करा. यात निवडल्‍या गेलेल्या प्रत्‍येक मुलाचे वेब पेज तयार केले जाईल. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी indiaart.khula.aasmaan@gmail.com या पत्त्यावर इमेल,+91-9325530547 क्रमांकावर संपर्क साधू शकता अथवा व्हाट्सएप करु शकता.