खुला आसमान म्हणजे काय ?
खुला आसमान - बाल कलाकार, बाल चित्रकार, बाल वैज्ञानिक, बाल शास्त्रज्ञ, युवा कलाकार, युवा वैज्ञानिक, युवा शास्त्रज्ञ यांची सर्जनशीलता व प्रतिभा व्यक्त होण्यासाठी व त्याला चालना देण्यासाठी
- आर्ट इंडिया फाऊंडेशन या सार्वजनिक धर्मादाय संस्थेतर्फे खुला आसमान व्यवस्थापित केले जाते. Indiaart हे आर्ट इंडिया फाऊंडेशन चे ऑनलाइन भागीदार आहे.
- खुला आसमान हे मुले, मुली, युवक व युवती यांच्या साठी सर्जनशीलता व्यक्त करण्यासाठीचे व्यासपीठ आहे. बाल कलाकार, बाल चित्रकार, बाल वैज्ञानिक, बाल शास्त्रज्ञ, युवा कलाकार, युवा वैज्ञानिक, युवा शास्त्रज्ञ यांच्या प्रतिभेला चालना आणि आव्हान देणे हे खुला आसमान चे उद्दिष्ट आहे.
- खुला आसमान मध्ये दोन भाग आहेत. कला आणि विज्ञान. खुला आसमान मुलांनी त्यांच्या कलाकृती अथवा कल्पना सबमिट करुन त्यांच्या अभिनव निर्मितीस प्रोत्साहन देते. हे सबमिशन खुला आसमान स्पर्धेसाठी असते. ही स्पर्धा २४ x ७ ऑनलाइन खुली असते.
- निवड झालेल्या प्रत्येक मुलासाठी एक वेब पेज समर्पित केले जाते. हे वेबपेज ३ वर्षे विनामूल्य व्यवस्थापीत केले जाते. या कालावधीत विद्यार्थ्यांना त्यांच्या नवीन कलाकृतींची छायाचित्रे अथवा कल्पना पाठवण्यास उत्तेजन दिले जाते.
- निवडक कलाकृती आणि कल्पनांचे पुन्हा दुसऱ्या फेरीत जजिंग केले जाते आणि त्यातून पदकांसाठी पुरस्कार ठरवले जातात.
- विद्यार्थी, पालक, शिक्षक समुदायासाठी प्रेरक आणि उत्तेजक अशी विनामूल्य सामग्री तयार केली जाते.
- दृश्यकला, performing आर्ट, साहित्य, स्थापत्यशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान, समाजसेवा, सार्वजनिक जीवन इ. विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्तींचे लेख, व्हिडीओज् या माध्यमातून ही सामग्री तयार केली जाते.
- खुला आसमान चे औपचारिक अनावरण ऑक्टोबर २०१६ मध्ये झाले. संपूर्ण भारतामधून तसेच इतर देशातून देखील एन्ट्रीज (कलाकृती) येत असतात.