सन्मान - खुला आसमान साठी
खुला आसमान
सामाजिक नवकल्पने वरील राष्ट्रीय परिषद २०१७ मध्ये, खुला आसमान एक सामाजिक नवकल्पना म्हणून सादर केली गेली.
खुला आसमानची निवड एक सामाजिक नवकल्पना म्हणून झाली आणि ती सामाजिक नवकल्पने वरील राष्ट्रीय परिषद २०१७ (NCSI - National Conference on Social Innovation) यात सादर करण्यात आली. ही वार्षिक परिषद नॅशनल इन्होव्हेशन फाउंडेशन ऑफ इंडिया (National Innovation Foundation of India), टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (Tata Institute of Social Sciences) आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर (Pune International Centre) द्वारे आयोजित करण्यात आली होती.
(डावीकडून उजवीकडे) डॉ. विजय केळकर, मिलिंद साठे, श्री. प्रकाश जावडेकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, श्री. जयंत उमराणीकर
खुला आसमान हे मुलांच्या सर्जनशील अभिव्यक्तीसाठी व्यासपीठ आहे. वंचित, ग्रामीण, आदिवासी आणि दूरस्थ समुदायातील मुले व तरुणांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाते. खुला आसमान विनामूल्य असून ५ ते १५ वर्षे वयोगटातील मुले व मुली तसेच १५ ते २५ वर्षे वयोगटातील युवक व युवतींसाठी आहे.