विषय : खुला
खुला आसमान निर्बंध घालण्यावर विश्वास ठेवत नाही. प्रत्येक मुलाने आणि युवकाने जिज्ञासू व सर्जनशील असावे, स्वत: न घाबरता व्यक्त व्हावे आणि आपला परीसर व माणसांशी माणूसकीने वागावे, संवेदनशील असावे यासाठी खुला आसमान प्रोत्साहन देऊ इच्छिते.
सुचविलेल्या विषयाशिवाय एखाद्या बालकलाकार किंवा युवा कलाकाराला कुठल्याही इतर विषयावर काम करायचे असल्यास खुला आसमान ते आनंदाने स्वीकारेल. यामध्ये खुला आसमानच्या आधीच्या स्पर्धेतील विषय जसे की मी आणि माझा सेल्फी (फोटो), मित्रमैत्रिणींबरोबर मौज, माझा आवडता चित्रपट, आगगाडीचा संस्मरणीय प्रवास, सर्वांसाठी शिक्षण, माझे आवडते कार्टून कॅरॅक्टर, रेल्वेचे आकर्षण, माझा अंतरिक्ष प्रवास, पाणी म्हणजे जीवन, स्वच्छ भारत, झाडे वाचवा – झाडे वाढवा, दिव्यांचा सण इ. असू शकतील. खुला आसमान आग्रह करते की या श्रेणीमध्ये मुले किंवा युवकांनी त्यांच्या आवडत्या कुठल्याही विषयावर कलाकृती सबमिट कराव्यात.
मुले (५ ते १५ वर्षे वयोगटातील) त्यांची शीघ्रचित्रे व रेखाचित्रे, रंगचित्रे, व्यंगचित्रे, कोलाज सबमिट करु शकतात. युवक (१५ ते 2५ वर्षे वयोगटातील) त्यांची शीघ्रचित्रे, रेखाचित्रे, रंगचित्रे, व्यंगचित्रे, विनोदी, कला, पोस्टर्स, डूडल्स, पेपरवरील ३डी कला, छायाचित्रे (कॅमेरा व सेल फोनवरील), डिजीटल कला (डिजीटल साहित्य वापरुन केलेली कुठलीही कलाकृती) सबमिट करु शकतात.
प्रत्येक कलाकृती सबमिट करताना खालील माहिती दिली आहे याची खात्री करुन द्या. शार्षक, वर्णन (कोणत््याही भाषेत) कलाकृतीचे माप आणि माध्यम.