विषय : वन आणि वन्यजीवन
वने संपत्ती आपली जीवनरेखा आहे, आपली आशा आहे. वने पृथ्वीचे आणि वातावरणाचे संरक्षण करतात. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी वने आवश्यक आहेत. लोकसंख्येची बेसुमार वाढ आणि मानवाचा लोभ यामुळे वनसंपत्तीचा ऱ्हास होत आहे आणि पृथ्वीवरील वातावरणासाठी गंभीर धोका निर्माण झाला आहे. जंगलामध्ये विविध प्रजाती निर्माण होतात आणि त्यामुळे एक संतुलित इकोसिस्टीम तयार होते जेथे विविध प्रकारच्या वनस्पती वृक्ष, प्राणी पक्षी एकाच ठिकाणी अस्तित्वात येतात.
इकोसिस्टिमधील विविधता आणि समतोल आपण वने आणि वनातील रहिवाशांकडून शिकला पाहिजे. खुला आसमान मुलांना आणि युवकांना आग्रहाची विनंती करते की त्यांनी नियमितपणे वनाना भेट देऊन तेथील इकोसिस्टिम, अदभूत विविधता आणि समतोलत्वाचा अनुभव घेतला पाहिजे.
मुले (५ ते १५ वर्षे वयोगटातील) त्यांची रेखाचित्रे, शीघ्रचित्रे, रंगचित्रे, व्यंगचित्रे, विनोदी कला, पोस्टर्स, डूडल्स, पेपर वरील त्रिमीती चित्रे, छायाचित्रे (कॅमेरा व सेल फोन वरुन) डिजीटल कला (डिजीटल साहित्य वापरुन तयार केलेली कुठलीही कलाकृती) सबमिट करु शकतात.
प्रत्येक सबमिट करत असलेल्या कलाकृती विषयी खालील माहिती दिली आहे याची खात्री करुन घ्या :
शीर्षक,
वर्णन (तुमच्या निवडीच्या कुठल्याही भाषेत),
कलाकृतीचे माप,
माध्यम