टिपण्णी आणि प्रशंसा
खुला आसमान
खुला आसमान बद्दल पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि इतरांकडून टिपण्णी, प्रशंसा आणि प्रशंसापत्र वाचा आणि ऐका.
खुला आसमान हा खरेतर मुलांमध्ये मोकळेपणा आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी खूप महान उपक्रम आहे. मुलांमधील सर्जनशीलतेला मुक्त करत, त्यांच्या विखुरलेल्या विचारांना दिशा देऊन कलेतून व्यक्त करण्यास याची खूप मोठी मदत होत आहे. प्रत्येक मुलाची निरोगी वाढ होण्यास पोषक असे वातावरण तयार होण्यासाठी हे अतिशय चांगले व्यासपीठ आहे. खुला आसमानच्या भविष्यातील प्रयत्नांना आमच्या तर्फे शुभेच्छा आम्ही त्यांच्या उपक्रमांमध्ये जरूर सहभागी होऊ.
- वैभव एस दंतले
पालक
व्हिडीओ पहा
खुला आसमान इंडिया आर्ट ने पद्धतशीरपणे आयोजित केलेले, मुलांच्या चित्रांचे प्रदर्शन पाहताना मी व माझी पत्नी हेमा, आम्हाला खूप आनंद होत आहे. या मागची मूलभूत संकल्पना खूपच प्रशंसनीय आहे. मुलांनी काढलेल्या चित्रांमधून त्यांच्यातील अप्रगट कौशल्य दिसून येते. आमची नात वैष्णवी पुणतांबेकर याविषयी याबद्दल खूपच उत्साहित आहे. खुला आसमानच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या तर्फे खूप शुभेच्छा !
- विनायक केलकर
पालक
व्हिडीओ पहा
इंडिया आर्ट गॅलरीविषयी ६ महिन्यापूर्वी आम्हाला पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी प्रशालेकडून कळले. आम्हाला छायाचित्र प्रदर्शन बघण्यासाठी व मिलिंद साठे यांना भेटण्यासाठी आमंत्रित केले होते. आम्ही हे प्रदर्शन पाहून खूप प्रभावित झालो. आणि आम्हाला येथेच त्यांच्याकडून ‘खुला आसमान’ विषयी माहिती मिळाली. माझा मोठा मुलगा आर्यन याने या स्पर्धेसाठी चित्रे पाठवली आणि त्यातून त्याचे एक चित्र निवडले गेले आणि अशा तऱ्हेने आम्ही इंडिया आर्ट गॅलरीशी जोडले गेलो.
इंडिया आर्ट गॅलरीची ही संकल्पना फारच नाविण्यपूर्ण आहे आणि मुलांमधील प्रतिभा शोधून काढण्यासाठी उपयुक्त आहे. मुलांमधील सर्जनशीलता व विविध विचार त्यांच्या चित्रातून व्यक्त करता येण्यासाठी हे फार मोठे व्यासपीठ आहे. आम्ही मिलिंद साठे यांचे खूप आभारी आहोत. त्यांनी इंडिया आर्ट गॅलरी तर्फे पूर्ण भारतभरातल्या मुलांसाठी विशेष व्यासपीठ तयार केले. या छान कामासाठी आमची काही मदत लागल्यास आम्ही जरुर तयार आहोत.
ऑईल पेस्टल माध्यमात काम करण्याची विविध तंत्रे आमच्या मुलांना शिकवल्याविषयी आम्ही चित्रा वैद्य मॅडमचे खूप आभारी आहोत.
आम्ही पुढील कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी उत्सुक आहोत धन्यवाद.
- उमेश कुलकर्णी
पालक
खुला आसमानविषयी माधुरी कुलकर्णी यांची टिप्पणी व्हिडीओ पहा.
वीडियो देखें
खुला आसमान हा इंद्रनीलसाठी हा खूपच छान अनुभव आणि exposure आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम मुलांचा आत्मविश्वास वाढवतात. हा इंडिया आर्ट टीमने हाती घेतलेला अतिशय उत्तम उपक्रम आहे. आमच्या तर्फे त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि असे कार्यक्रम पुन्हा-पुन्हा होत राहोत. मुलांमधील आत्मविश्वास आणि सर्जनशीलता वाढविण्याच्या दृष्टीने हा उत्तम मार्ग आहे.
- अंजली आर नाइक
पालक
ऑइल पेस्टल्सची जादू या कार्यशाळेमुळे जिवंत झाली. साधी, सोपी ऑईल पेस्टल रंगलेपनाची तंत्रे शिकवली जाताना आणि मुलांनी शिकताना बघायला छान वाटले. अशा प्रकारचे संवादात्मक सत्र आयोजित केल्याविषयी इंडिया आर्ट गॅलरी खुला आसमान मंचाचे मन:पूर्वक आभार. अशा प्रकारची त्या-त्या क्षेत्रातील तज्ञांकडून घेतल्या जाणाऱ्या सत्रांमध्ये मुले सहभागी होऊन आनंद घेत आहेत. हे पहायला मला नक्कीच आवडेल. अशी अधिकाधिक सत्रे होवोत ही अपेक्षा.
- मोनिरुपा शेट्टी
पालक
खुला आसमान खूप नाविण्यपूर्ण आणि उपयुक्त असे व्यासपीठ आहे जेथे मुले मुक्तपणे आविष्कार करु शकतात. आम्हाला आणि मुलांना येथे खूप मजा आली. या छताखाली ही जी कार्यशाळा घेतली गेली ती युवा कलाकारांमधील कलात्मक कौशल्य अधिक वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. चित्रा वैद्य सारख्या नैपुण्य असलेल्या व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली अशी अधिकाधिक कार्यशाळा व प्रदर्शन भरवली जावीत याची वाट पहात आहे.
- मधुरा देशपांडे
कला शिक्षक, पालक
आम्ही दोन महिन्यांपूर्वीच याविषयी प्रथम ऐकले. सुरुवातीला वाटले की ही शाळेत केली जाते तशीच काहीशी स्पर्धा आयोजित केली असावी. परंतु अधिक तपशीलात गेल्यानंतर असे लक्षात आले की हे काहीतरी वेगळे आहे. खरोखरचं मुलांनी स्वत: विचार करण्यासाठी आणि त्यांना काहीतरी वेगळे करण्याची संधी देण्यासाठी हा उपक्रम केला जात आहे. माझ्या मुलाचे चित्र निवडले जाऊन त्याची सर्जनशीलता अधिक वाढण्यासाठी त्याला हे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले हे मला फारच आवडले. हे असेच चालू राहू दे यासाठी शुभेच्छा.
- आशुतोष देशपांडे
पालक
मि. सौ. रेश्मा श्याम कासरूंग मला खुला आसमान खूप आवडला. आम्हाला खुला आसमान काय प्रकार आहे. हे माहितच नव्हतं. पण जेव्हा शाळेमधून सांगितलं तुमच्या मुलीचा नंबर अशा अशा वेबसाईटवर बघीतलं. खूप छान वाटलं. आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या मुलांना पूर्ण देशामध्ये थोडक्यात ऑनलाईन नाव आम्ही बघू शकतो. खरंच तुमची ही कल्पना खूप छान वाटली. त्यामधून मुलांनाच नाही तर आम्हालासुद्धा थोडक्यात प्रोत्साहन मिळालं. आमच्या मुलांमध्ये असलेली कला आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवू शकतो.
- सौ. रेश्मा श्याम कासरूंग
पालक
आज ह्या ठिकाणी मला पेंटिंग म्हणजेच सर्व असे समजत होते. पण पेंटिंगच्या माध्यमातून मुलांना इंडिया आर्टचे सहकारी बंधूंनी आम्हाला खूप काही शिकवलं व आपल्या मुलांमधील गुणांची जाणीव करून दिली. त्याबद्दल मी आपली खूप आभारी आहे.
- सौ. अंजू संजय कांबळे
पालक
माझे मिस्टर जलाल अहमद अन्सारी व मी आम्ही दोघे २१ मे रोजी इंडिया आर्ट गॅलरीमध्ये आमचा लहान मुलगा मुदस्सरला घेऊन आलो. इथे आल्यावर इथल्या आर्ट गॅलरीत आमच्या मुलाचे पेंटिंग पाहून आनंद झाला. तसेच इथे बरेच काही आमच्या पाल्याला शिकण्यास भेटले. त्याला पेंटिंग करण्याची आवड आहे. इथे त्याच्याबद्दल माहिती त्याला मिळाली व आणखी पुढे त्याला पेंटिंग करण्यात उपयोगी पडेल अशी माहिती मिळाली. त्याबद्दल धन्यवाद ! खुला आसमान काय आहे हेसुद्धा आम्हाला समजले. त्याबद्दल खूप आनंद झाला. असा स्टेज पुन्हा आम्हाला भेटावा ही विनंती.
- शबनम जलाल अहमद कन्सारी
Parent
मी सौ. धनश्री श्रीराम साठे. खुला आसमान या संकल्पनेशी माझी ओळख श्री. मिलिंद साठे यांच्यामार्फत झाली.
माध्यमाचे स्वातंत्र्य, वैचारिक स्वातंत्र्य व आपल्या सोयीनुसार चित्र काढण्याची मुभा हा विचारच फार चांगला आहे. त्यामुळे कल्पनाशक्तीला नक्कीच वाव मिळेल असे वाटते.
इतर कोणत्याही चित्रकला स्पर्धेपेक्षा खुला आसमान मला जास्त चांगली स्पर्धा वाटली. या संकल्पनेला खूप शुभेच्छा व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
- सौ. धनश्री श्रीराम साठे
पालक
मी आज दिनांक २१ मे रोजी भोसलेनगर येथे इंडिया आर्ट गॅलरीमध्ये आलो. मी जे आज येथे पाहिले त्यामधून मला खूपकाही शिकण्यासारखं मिळालं. माझ्या मुलामध्ये असलेली कला मला प्रथम पाहयला भेटली की त्याचामध्ये काहीतरी गुणविशेष आहे. आणि ह्या संस्थेमध्ये जे कामकरणाचे जे सर लोक आहेत त्यांनी आम्हाला दाखवून दिले की फक्त ड्रॉईंग करणे हेच केवळ ध्येय नसून त्यांच्यातून खूप काही मुलांमधील गुण आपल्याला बघायला भेटतात. मी हे जाणीव करून दिल्याबद्दल इंडिया आर्टच्या सहकार्यांचा आभारी आहे.
- श्री. विनायक ग. तिकोने
पालक
खुला आसमानचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. नावातच मुलांच्या विचारांना मोकळं आकाश देणं’ हे ध्येय दडलेलं दिसतंय. मुलीचं चित्र Select झालंय हे कळाल्यावर खूप आनंद झाला. तिचा आत्मविश्वास वाढला. मुलीची २ चित्रे Gallery मध्ये बघून तिने बघीतलेल्या स्वप्नांची सुरुवात झालेली दिसते.
चित्रकलेचे Skill पेक्षा त्यातील Idea, concept & creative thinking ह्यावर इथे भर दिला जात असल्यामुळे कलेतील सर्वांगिण विकास साधला जातोय असे मला वाटते. प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागणार्या काळात एवढा मोठा उपक्रम नि:शुल्क केला जातोय ह्याबद्दल Organizers व मिलिंद साठे सर ह्यांच्या बद्दलचा आदर आणखीनच वाढला. तसेच मुलांची चित्र विकायची नाही हा Concept पण खूप आवडला. त्यातून कला ही अमूल्य असते ही शिकवण मुलांना मिळाली. तसेच मोठ्या Artist कडून जे मार्गदर्शन आज मिळाले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. एकूणच राष्ट्राच्या उभारणीसाठी नवीन पिढीला चाकोरीबद्द दृष्टिकोनातून बाहेर काढून खुला आसमान मिळवून देणे ह्यासाठी ह्या उपक्रमासाठी खूप खूप धन्यवाद !!!
- सौ. धनश्री कैलास पुणतांबेकर
पालक
कला मुलांसाठी एका सुंदर जगाचे दार उघडते. आपण त्यांच्या कला निर्मितीचा आदर केला पाहिजे आणि त्यांना मोकळीक दिली पाहिजे.
- चित्रा वैद्य
चित्रकार, कला शिक्षक
कला माझ्यासाठी आवश्यक आहे. मी कधीही काम किंवा भार म्हणून कलेकडे बघत नाही तर एका आनंददायी छंद म्हणून बघते. खुला आसमान हा माझ्यासाठी एक अदभूत अनुभव होता. कलाकृती प्रदर्शित करण्यासाठी खुला आसमान घेत असलेले परिश्रम बघण्यासारखे आहेत. मला खुला आसमान आवडते कारण ते आम्हाला सर्जनशीलता व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य देते.
- रुचा दामले
खुला आसमान सहभागी
कला म्हणजे कधीच न संपणारा साहसी प्रवास आहे. मी माझ्या कलाकृती सबमिट करण्याचा आनंद घेतला. गॅलरीमध्ये प्रदर्शित केलेली इतर मुलांची चित्रे बघताना मजा आली.
- मिहीका परुळेकर
खुला आसमान सहभागी
खुला आसमान ही मुलांसाठी एक अदभूत संकल्पना आहे. खूप साधी आणि सोपी सबमिशन्सची पद्धत वर्षातून एकापेक्षा अधिक फेऱ्या आणि विविध कला प्रकार यात स्विकारले जातात.
- स्वप्नील परुळेकर
पालक
मुलांच्या कलाकृती बघताना खूपच उत्साहवर्धक वाटते. अनेक कुशल चित्रकारांनाही आश्चर्यचकित करेल अशा रितीने मुले हे जग पाहू शकतात. फक्त त्यांना स्वातंत्र्य आणि मोकळेपणा (Exposure) मिळाला पाहिजे.
- दिवंगत वसंत सरवटे
वरिष्ठ चित्रकार, व्यंग चित्रकार, लेखक, कलाकार
मुलांच्या पुस्तकांसाठी अनेक कलाकृती तयार केल्या आहेत.
आमच्या शाळांमध्ये कलाशिक्षण देण्याच्या पद्धतीत त्वरीत सुधारणा करणे आवश्यक आहे. मुलांनी अधिक व्यक्त होण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे.
- डॉ. नलिनी भागवत
ज्येष्ठ कलाकर,
Former faculty at Sir J.J. School Of Arts, Mumbai
बच्चों की कला में निर्दोषता मानव जाति की दृष्टि को दर्शाती है।
- प्रभाकर कोल्टे
वरिष्ठ कलाकार,
सर जे जे स्कूल ऑफ आर्ट, मुंबई में पूर्व संकाय
शब्दांमधून जे व्यक्त होऊ शकत नाही ते कलेच्या माध्यमातून होऊ शकते. माझ्या मुलीच्या कलाकृतींमधून मला कायम तिच्या बाल मनात डोकावायची संधी मिळते. मुलांनी मुक्तपणे व्यक्त होण्यासाठी व त्यांच्या मनातील विचार व भावना कलेच्या माध्यमातून पोहोचविण्यासाठी इंडिया आर्ट च्या प्रयत्नांची नक्कीच मदत होईल.
- टीना बाली रुद्र
वास्तुविद्याविशारद, पालक
नेहरु सेंटर मध्ये भरविले गेलेले मुलांच्या चित्रांचे प्रदर्शन म्हणजे मुलांमधील सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे व ती साजरी करणे यासाठी इंडिया आर्ट ने केलेला उज्ज्वल उपक्रम होय. मुलांना अभिव्यक्त होण्यासाठी हे अतिशय योग्य व्यासपीठ आहे व यामुळे त्यांचे स्वत: विषयीचे चांगले मत, कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता वाढवण्यास मदत होते. २२ जूनच्या रविवारी केलेले हे प्रदर्शन अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजित केले होते. अगदी प्रशस्तिपत्रके देण्यापासून, भाग घेतलेल्या मुलांच्या चित्रांचे प्रदर्शन ते ज्येष्ठ चित्रकार श्री प्रभाकर कोलते यांचे माहितीपूर्ण भाषण. त्या कलाकृतींचे ऑनलाईन प्रदर्शनही तितकेच सुंदर आहे. ज्यांनी नेहरु सेंटरचे प्रदर्शन बघितले नाही त्यांनी नाउमेद न होता ऑनलाईन प्रदर्शन बघावे.
- श्रीमती प्रिया सुब्रमणीयन
पालक
या प्रदर्शनाला भेट देणं हा एक अदि्वतीय अनुभव होता. एवढ्या लहान वयातही इतकी प्रतिभा अस्तित्वात असू शकते हे आम्हाला कळले !!! इंडिया आर्ट हे प्रदर्शन भरावून खरोखरच खूप थोर काम करत आहे. ज्यामुळे मुलांना कलेच्या क्षेत्रात अधिकाधिक उंची गाठण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे.
- नूतन कुमार जोशी
पालक
इंडिया आर्टचे प्रदर्शन ही तरुण, होतकरु आणि प्रतिभावान मुलांना आणि युवकांना अतिशय चांगली संधी आहे. अनन्या कोप्पीकर मूर्थी, माझी मुलगी हिचे चित्र येथे लागल्यामुळे तिला खूप प्रेरणा मिळाली. धन्यवाद आणि आपल्याला अधिक शक्ती मिळो.
- स्मृती कोप्पीकर आणि गोपाल मूर्थी
पालक
ही पूर्ण संकल्पना फारच प्रेरणादायक आहे. मुलांची चित्रे नेहरु सेंटरमधील प्रदर्शनात लागल्यामुळे त्यांना खूप आनंद आणि अभिमान वाटला. युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी इंडिया आर्ट हे अतिशय चांगले व्यासपीठ आहे.