पोस्टकार्ड वरील पेन्टिंग, डूडल, चित्र, कार्टून स्पर्धा
खुला आसमान
"पोस्टकार्ड वरील कला" मध्ये सहभाग घेण्यासाठी मार्गदर्शकतत्त्वे आणि इतर माहिती :
- पेन्टिंग, स्केच, डूडल, चित्र, कला, कार्टून, व्यंगचित्र करण्यासाठी पोस्टकार्डची एक संपूर्ण बाजू वापरा.
- आपल्या आवडीचे कोणतेही माध्यम वापरा - पेन्सिल, पेन व शाई, पेस्टल, क्रेयॉन, स्केच पेन, जेल पेन, बॉल पेन, पोस्टर रंग, अॅक्रेलिक रंग, वॉटर कलर्स
- पोस्टकार्डच्या दुसऱ्या बाजूला, आपले नाव, पत्ता, ईमेल आयडी आणि आपल्या शाळेच्या नावासह संपर्क क्रमांक लिहा. शीर्षक, वापरलेले माध्यम आणि आपल्या कलाकृतीचे संक्षिप्त वर्णन देखील लिहा.
- हे पोस्ट कार्ड पाकिटात घालून खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्ट करा. आपण पाकिटामध्ये पोस्ट कार्ड घातल्यानंतर पाकिटावर 5 रुपये मुद्रांक लावा. पाकिट बंद करा आणि पोस्टात टाका.
- पोस्टकार्ड् पाकिटामध्ये न घालता पाठवू नका. त्याचे नुकसान होऊ शकते. पाकिटाशिवाय पाठविलेले कोणतेही पोस्टकार्ड स्वीकारले जाणार नाही.
- एका पाकिटातुन एका पेक्षा जास्त पोस्टकार्डस पाठविता येतील. त्यासाठी योग्य मूल्याचे मुद्रांक लावावे.
- स्पर्धेसाठी पाठविलेली पोस्टकार्डस खुला आसमान ची मालमत्ता बनतील व परत दिली जाणार नाहीत.
- खुला आसमान हा व्यावसायिक उपक्रम नाही. खुला आसमान कडे आलेली पोस्टकार्ड विक्रीसाठी उपलब्ध नाहीत. खुला आसमान मुले, मुली, युवक व युवती ह्यांच्यातील सर्जनशील विचारांना प्रोत्साहन देण्यासाठीचा उपक्रम आहे.
- पोस्टकार्ड वरती केलेल्या निवडक कलाकृती आमच्या वेबसाइटवर "पोस्टकार्ड वरील कला" विभागामध्ये प्रदर्शित केले जाईल.
- खुला आसमान वेळोवेळी विविध कार्यक्रम आणि प्रदर्शनांमध्ये निवडक पोस्टकार्ड्स प्रदर्शित करेल.
- "आर्ट ऑन पोस्टकार्ड" किंवा “पोस्टकार्ड वरील कला” मध्ये सहभागी होणाऱ्या प्रतिभावान मुले, मुली, युवक व युवती ह्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन देण्यासाठी खुला आसमान वचनबद्ध आहे.
- "आर्ट ऑन पोस्टकार्ड" या उपक्रमाखाली पोस्टकार्ड पाठविलेल्या निवडक बाल कलाकार व युवा कलाकार यांच्यासाठी खुला आसमान समर्पित वेब पृष्ठ तयार करेल.
खुला आसमान आपल्या पोस्टकार्ड वरील सुंदर कलाकृतींची प्रतीक्षा करत आहे.
पोस्टकार्डवर कला पाठविण्यासाठी पत्ता :
खुला आसमान
c/o आर्ट इंडिया फाउंडेशन
"गायत्री"
६१/९, युनाइटेड वेस्टर्न हाऊसिंग सोसायटी
कर्वेनगर, विठ्ठल मंदिराच्या विरुद्ध
पुणे ४११०५२, महाराष्ट्र, भारत