About Khula Aasmaan Why Khula Aasmaan What is Khula Aasmaan Comments & Testimonials Entries from locations Recognition Downloads
Regular Contest World of Mahatma Gandhi Contest Contest Results Prizes Shortlisted Child Artists Shortlisted Young Artists
Art on Postcard Articles & Write ups Blogs Khula Aasmaan Science Khula Aasmaan Photography
Home » Khula Aasmaan » World of Khula Aasmaan » Conversations, audio recordings and podcasts » Dr. Kiran Kulkarni
In this insightful and inspiring speech delivered at a teachers conference, Dr. Kiran Kulkarni touches upon several aspects of education, learning and the important role that teachers need to play. This masterclass is a must for all teachers.
आपल्याकडे बोलण्यासारखे काही आहे की नाही हा विचार मनात आल्यावर माझा शिक्षणाशी जो काही संबध आणि संपर्क आलेला आहे. आतापर्यत वेगवेगळया स्वरुपात तो मला आठवायला लागला. एक गुपित तर आधीच फोडून शकतो मी की आज काय बोलायचय हे काही मी ठरवलेले नाही. इथे जे मनात येईल ते मी बोलणार म्हणजे एका अर्थी आताच भाषण हे भाषण नसून ते उत्स्फूर्त स्वगत आहे. त्याच्यामुळे त्यामध्ये कधी कधी मुददा एखादा सोडून दिला जाईल. एखादा प्रश्न उपस्थित केला जाईल पण त्याच्या उत्तराबददल लवलेश नसेल अस होऊ शकतो विचार करतांना कसं आपण कुठूनही कुठेही जातो कि नाही तसे हे भाषण असणार आहे. हे एक शिस्त्बध्द रचना बध्द आखलेले असे भाषण नाही. तर सांगत असे होतो मी कि काय काय आपला संबध आला याचा मी थोडासा एक आढावा घेतो त्याचा शिक्षणाशी कसा कसा काय काय संबध आला ,मी तुमच्या सारखाच अतिशय छोटया गावामध्ये शिकलेला आणि मराठी मिडियमचा स्टुडंट आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही याच नगर जिल्हयाचा मी पुत्र. माझ सगळं शिक्षण इथून एक दिड तासाच्या अंतरावरती असलेल्या श्रीरामपूर या गावात झालंय. तिथच मी लहानाचा मोठा झालो त्यामुळे तिथल एक २५ -३० वर्षापुर्वीचं ४० वर्षापुर्वीचं वातावरण तुम्हाला इमॅजिन करता येईल की तेव्हा श्रीरामपूर हे गाव जरा डेव्हलप होत होतं. व्यापारी पेठ म्हणून त्याचं नाव होत म्हणजे साखर कारखाने बंद पडल्यानंतर जी विपणाव्यवस्था आली त्याच्या आधीची अवस्था त्यावेळचे श्रीरामपूर होते. आणि तिथ मी शिकलो जसं पु.ल. देशपांडेच्या बिगारी ते मॅट्रीक या लेखामध्ये त्यांनी त्यांच्या शिक्षणाबददल लिहीलेले आहे आणि तो शिक्षणाच्या इतिहासचा एक उत्तम दस्तऐवज ठरतो. पुस्त्क वाचायला हरकत नाही तो लेख वाचायला हरकत नाही तुम्ही सगळयांनी त्या काळाचं शिक्षण कसं होतं आणि शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन , शिक्षकाचा विदयार्थ्याचा आजूबाजूच्यांचा पालकांचा काय होता याचं एक भान त्या लेखनातून आपल्याला मिळतं. तर तसं माझा प्रोमो झाला की, माझ्या बालवाडीपासून माझ्या मॅट्रीकपर्यतच्या शिक्षणाचा एक धावतापट नजरेसमोरुन गेला खरं सांगायच तर त्यातल्या अनेक त्रुटया आपण जाणतो आणि त्यातले काही प्लस पॉईटपण जाणतो पण आता ते मी बोलत बसलो तस साहेबांनी काय स्वत:च चऱ्हाट लावलं असे सगळे म्हणतील त्याच्यामुळे मी त्यांच्याबददल बोलणार नाही. फक्त् एवढच सांगेन की त्यातून जे काही रूजत गेलं त्या सगळयाच्या माझ्या व्यक्तीमत्वामध्ये पुढे लोक ज्याला यश म्हणतात. त्या यशामध्ये सहभाग रहात गेला. त्यांच्यानंतर महाविद्यालयीन जीवनामध्ये मी नगर आणि नंतर पुणे अशा दोन्ही ठिकाणी कॉलेजेस मध्ये असतांना एका वेगळया पध्दतीने शिक्षणांशी संबध आला. हे मी का सांगतोय याचा कदाचित नंतर तुम्हाला संदर्भ लागेल.
तो संदर्भा असा आला की, रेग्युलर नियमित महाविदयालयीन शिक्षण घेत असतांना मी विदयार्थी सहाय्य्क समिती ही एक संस्था पुण्यामध्ये आहे. त्या हॉस्टेलला मी रहात होतो. ते गरिब विदयार्थ्यासाठीचं होस्टेल होते. गरिब विदयार्थ्यासाठीचं म्हणजे ज्याच्याकडे पुरेसे पैसे नाहीत असे विदयार्थी असे पालक तिथ आपल्या मुलांना तेथे ठेवायचे आणि मग तिथे कमवा आणि शिका योजना होती म्हणजे आपण काम करायचे म्हणजे तिथं मग मेसचे कामही आम्हीच करायचे साफसफाई ,स्वच्छता सुध्दा आम्हीच करायचो आणि कुणातरी पालकांकडे म्हणजे समितीचे पालक होते काही त्यांच्याकडे काही काम करायचो तर मला मासे विक्रीला येतात. शोभेचे मासे, त्यांना बिडींग करायचे काम माझ्याकडे होते. ते काम ही केलं. स्वच्छतेची कामे केली आणि मुख्य म्हणजे तिथं एक शेजारी झोपडपटटी होती त्या झोपडीपटटीतल्या विदयार्थ्याना शिकवणे त्याला सामाजिक बांधिलकी उपक्रम असं नाव होते. दररोज संध्याकाळी दोन तास ६ ते ८ झोपडपटटीतल्या मुलांना शिकवयाचे असा तो उपक्रम केला . या सगळयाचा माझ्या शिक्षणाकडे बघण्यावरती परिणाम झाला. त्याच्यापुढे महाविदयालयीन जीवन झाल्यानंतर मला एक फार मोठी संधी मिळाली. किती मोठी संधी असावी तुम्ही शिक्षण क्षेत्रातली लोक आहात म्हणून तुम्हाला सांगतो आपल्या महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी अनौपचारीक शिक्षण , नॉन फॉरमल एज्युकेशन ही कंन्सेप्ट इंटरडयुस केली आणि राबवून दाखविली. त्या शिक्षण तज्ञ डॉ. चित्रा नाईक यांच्या बरोबर काम करण्याची मला संधी मिळाली. मी इंडियन इन्स्टियूटयूट ऑफ एज्युकेशन म्हणजे भारतीय शिक्षण संस्था या संस्थेत रिसर्च फेलो म्हणून जॉईन झालो आणि माझ्या M. Phil च्या गाईड होत्या चित्रा नाईक त्यांच्या बरोबर काम करतांना शिक्षणाकडे बघण्याचा एक वेगळा एक दृष्टिकोन मिळाला. मग माहिती नाही माझी ती कर्तबगारी होती की त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला पण त्या संस्थेतून शिक्षण आणि समाज , एज्युकेशन ॲन्ड स्पेशल चेन नावाचे जे त्रैमासिक निघत होते त्यांचा मी संपादक म्हणून दोन वर्ष काम केलं. त्यातून मला काही थेरॉटिकल गोष्टी समजल्या आणखी पुढे गेल्यानंतर मला असं लक्षात आलं की आपल्याला पालकांसाठी काम करायला पाहिजे. आणि त्यातून माझा शांताबाई किर्लोस्करांशी संपर्क आला . पालक शिक्षण संघाची जी कल्पना महाराष्ट्रामध्ये ज्यांनी रुजवली, वाढवली त्यांच्या बरोबर काही काम मला करायला मिळाले आणी मी त्यांचा मानसपुत्र असल्यासारखा असल्यामुळे पुण्यामध्ये माझी राहण्याची व्यवस्था त्यांच्या घरीच होती. त्यामुळे २४ तास मला शिकण्याचा अनुभव तिथ मिळाला. त्यामुळे पालक शिक्षक संबध कसे असावे त्याचा मुलांच्या व्यक्तीमत्व विकासावरती काय परिणाम होतो या सगळयाचा एक बारीक अभ्यास आणि विचार झाला. मग मी स्वत: पालक प्रशिक्षणं घ्यायला सुरुवात केली. जवळपास १०० एक पालक प्रशिक्षणं मी स्वत: conduct केलेली आहेत. आणि मग माझ्या मनात असा विचार आला की एकुनच शिक्षण या गोष्टीसाठी माध्यम खूप वेगळी वेगळी वापरता येतील आणि शिक्षण शिक्षण म्हणजे काय नक्की, तर एनजीवील एज्युकेशनल इन्टर डिस्प्लेनरी करताना मला जे कळलं ते असं कळलं की शिक्षण म्हणजे काही शिकवणं हा प्रकार नसतोच . शिकवणं हा काही प्रकार अस्तित्वातच नाही. शिक्षणाचा खरा अर्थ त्या मुलाला त्या व्यक्तीला विद्यार्थ्याला जे काही जाणवायचंय ते त्याला जाणवण्यासाठी तयार केलेली निमित्त म्हणजे शिक्षण आणि सगळया शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी, अधिक्षकांनी असा विचार करायला पाहिजे कि माझ्या विदयार्थ्यानी शिकावे असे मला वाटत असेल तर त्यांनी शिकावं याच्यासाठी मी निमित्त काय करायला पाहिजे. हे निमित्त बोलण्यातून तयार होऊ शकतात, गोष्टीतून तयार होऊ शकतात. वागण्यातून तयार होऊ शकतात. रोज वागण्यातून तयार होवू शकता.आता ठुबे साहेबांनी हा जो कार्यक्रम घेतला हा आपल्यासाठीच्या शिक्षणाचं ते निमित्त आहे. कारण वर्श बददल आता माहिती सांगितली त्यांच्यामुळे आपल्या मनामध्ये बुध्दीमध्ये काही तरंग तयार झाले त्याच्यामुळे काही आपल्या कन्सेप्टला बदल करणाऱ्या गोष्टी आपल्या डोळयासमोर आल्या, आपल्या मनासमोर आल्या हे शिक्षण आहे. या दृष्टिने जर शिक्षणाकडे पाहिजे आणि मुलांच्या शिक्षणाकडे पाहिलं तर आपल्या आदिवासी विदयार्थ्यासाठीच्या आश्रम शाळांमध्ये नक्की काय परिस्थीती होती. काय आहे आणि आपल्याला कुठे जायचयं आज मला हे आवर्जुन सांगावसं वाटतं माझ्या शेजारी बसलेले जे मान्यवर उभे आहेत त्यांनी पण मला हे आवर्जुन सांगितले की, पूर्वी टॉयलेटसच नसायची हि तक्रार असायची. आता आम्ही टॉयलेटच्या स्वच्छतेबददल बोलायला लागलो. म्हणून कुठे उभे होते कुठे आलोय आता कुठे जायचेय तर तुम्ही दिवसातल्या कोणत्याही वेळेसे तेथे जा अतिशय स्वच्छ आणि सुंदर असंच टॉयलेट दिसेल इथपर्यत जायचं. कदाचित तिथपर्यत गेल्यावर आपल्याला पुढच काहीतरी क्षितीज दिसणार आहे . या क्षेत्राबददल सांगतो प्रत्येक क्षेत्राबददल हा विचार करायला पाहिजे म्हणजे एकलव्यचा प्रोग्रॅम असेल करडीपथचा प्रोग्रॅम असेल आपलं इनिशिएटिव्हज खूप आहेत. त्याची यादी मी सांगत बसणार नाही. त्या प्रत्येकामध्ये आपल्याला हा विचार करावा लागेल की कुठे होतो कुठे आहोत आणि कुठे जायचयं आणि जिथे पोहोचायचेय तिथे पाहोचण्यासाठी आपल्याला काय काम करारायचे . आता कदाचित पुन्हा मी उपदेशाच्या मोड मध्ये जायला लागलोय मला जायचं नाहीय, मला ब्रेन स्ट्रॉर्मिग करायचंय आता निवेदकांनी फार चांगला शब्द वापरला आम्ही सकाळ पासून ब्रेन स्ट्रॉर्मिग करतोय या Brain Storming ची जी मजा आहे शिक्षण क्षेत्रामध्ये ती मला घालवायची नाहीये आणि म्हणून मी उपदेशात्मक भाषेत न जाता मी सुध्दा ब्रेन स्ट्रॉर्मिग करणारे माझ्या मनातले काही प्रश्न सुध्दा मी मांडणार आहे. त्याला कदाचित उत्तरे लगेच सापडणार नाहीत. आपल्या सर्वाना विचार करावा लागेल. पहिला प्रश्न माझ्या मनात आहे. आपण काय झालयं शब्द फार गुळगुळीत होऊन गेलेय. त्याचे अर्थ आपण विसरल्यासारखे झालेत तसा एक शब्द आहे. तो म्हणजे गुणवत्ता. गुणवत्ता वाढ करायाला पाहिजे किंवा आयुष प्रसाद साहेबांनी गुणवत्ता विकास प्रकल्प् सुरु केला किंवा आदिवासी विदयार्थ्याच्या गुणवत्ता वाढीसाठी विभागाने विशेष परिश्रम घ्यायला सुरवात केली म्हणजे काय गुणवत्ता म्हणजे काय, कशाला गुणवत्ता म्हणायचे आणि गुणवत्तेची डेफिनेशन करण्याचा अधिकार आपल्याला तरी कोणी दिला. विदयार्थ्यांची गुणवत्ता हि अमूक एक क्षेत्रात आहे. त्याची अमूक एक क्षेत्रात वाढ आपल्याला करायची आहे हे आपण ठरतोय तो अधिकार तरी आपल्याला कोणी दिला आणि मुळात गुणवत्ता म्हणजे काय आणि या प्रश्नापाशी मी फार पूर्वी पासून अडखळेलोय . अजूनही मला उत्तर धडसं सापडलेले नाही. गुणवत्ता म्हण्जे मराठीतले मार्क , इंग्रजीतले मार्क का १०वी मध्ये मेरीटमध्ये येणं का पूर्वीच्या काळात बोर्डाचे कौतुक होतं म्हणून बोर्डात येणं का त्या मुलाला इंजिनियरींगला एडमिशन मिळणं म्हणजे गुणवत्ता. कशाला म्हणायचयं गुणवत्ता. ते जर आपल्याला सापडलं तर मला वाटत आपल्या कामामध्ये एक प्रकारची शिस्त येईल आणि एक प्रकारचा दृष्टिकोन येईल पण मला असं वाटतं ठुबे साहेब ते आपल्याला सापडूच नये. कारण त्याचा शोध इतका सुंदर आहे. गुणवत्ता म्हणजे काय आणि एखादया विदयार्थ्यातली एखादी गुणवत्ता म्हणजे त्यांच्याकडे झाडण्याचं फार उत्तम कौशल्य असेल त्याच्यामध्ये ती गुणवत्ता आहे. तीचा विकास होऊ शकतो. कोणी बोलत छान असेल ,हसत छान असेल, कोणी लिहीत छान असेल, कोणी नाचत छान असेल, कोणी गाणं गात असेल आपण तसं काही करु शकणार नाही अशा गोष्टीत त्याला फार चांगलं स्कील त्यांच्यामध्ये असेल आणि गुणवत्ता फक्त्ा कौशल्यांशी निगडीत नाही. शिक्षणातली गुणवत्ता ही त्यांच्याही पलिकडे जाणारी आहे. उत्तम प्रकारचा माणूस बनवणारी आहे. त्यामुळे मी सगळयांना आजच्या या परिषदेच्या निमित्ताने असे अवाहन करेल की, गुणवत्ता म्हणजे काय याचे डेफिनेशन करण्याच्या ऐवजी गुणवत्ता काय काय असु शकते मुलांमध्ये त्याचा शोध जर घेत गेलो तर प्रत्येक मुल म्हणजे एक वेगळा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये वेगळी गुणवत्ता आहे. जसं एखादया पुस्तकांमध्ये भाषेचं सौंदर्य असून एखादया पुस्तकांमध्ये रचनेचं सौंदर्य असतं एखादया पुस्तकामध्ये आशयांच सौंदर्य असतं तसे प्रत्येक मूल हा एक वेगळा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये वेगळं काहीतरी सौंदर्य आहे वेगळं काहीतरी गुणवत्तेचे पोटेन्शिअल आहे. ते आपण शोधत राहू आयुष्यभर ,तुमच्या सारखे सुखी नाहीत आता ठुबे साहेबांनी माझ्याबददल जे वाक्य बोललं ते खरं आहे. या सभागृहामध्ये सर्वात दुर्देवी सध्या मी आहे . याचं कारण असं की, अनवॉन्टेड अशा खूप गोष्टीमध्ये माझ्या वेळ जातो आणि माझा विदयार्थ्याशी संबधच येत नाही म्हणजे शिक्षण हा माझा जिव्हाळयाचा आणि ह्रदयाच्या जवळच्या विषय असून सुध्दा शिक्षणाशी आणि विदयार्थ्याशी माझा काडीमात्र संबध येत नाही. याच्यापेक्षा दुर्देव तरी कोणतं तुम्ही सगळे सुदैवी आहात. तुम्हाला रोज अनेक पुस्तकं वाचायला मिळतात.
विदयार्थ्याच्या रुपाने आणि त्याच्यामुळे त्यांच्या शोध आपण सतत घेत रहावा असं मला वाटत हा झाला एक मुददा मग ही गुणवत्ता वाढविण्यासाठी उभारणीचे वेगळे वेगळे उपक्रम घेतले त्याच्यामागचा दृष्टिकोन काय आहे ही जी मंडळी बसलेली आहेत NGO चे प्रतिनिधी बसलेले आहेत. अनेक NGO आपल्याला मदत करत आहेत. आता खरं सांगायच तर वर्मा मॅडम आल्यापासून उपक्रमांच्या नवीन नवीन प्रकल्पांचा भडिमार चाललेला आहे. एक संपलं की दुसरं उसंत नाही हे ट्रेनिंग घेऊ का ते ट्रेनिंग घेऊ नुसती धावपळ आणि मग अशा अनेक प्रतिक्रया ज्या खोटया नाहीत शिक्षणाचे एक वैशिष्ट आहे खोट काहीच नसतं आणी सगळीकडे एक तटस्थ्ा नजरेनं बघण्याची नजर असते. त्या प्रतिक्रिया सुध्दा मला समजतात . वर्मा मॅडमलाही समजतात. विभागाला सुध्दा समजतात. तेव्हा जो भडिमार चाललेला आहे याच्यातून काय प्रतिक्रिया येणार आहेत. पहिली प्रतिक्रिया काही अर्थ आहे का इथं अजून इमारती नाहीत बसायला बेंचेस नाही आणि हे काय घेउन बसले ही एक प्रतिक्रिया असू शकते, दुसरी प्रतिक्रया बरोबर उलट हे बेंचेस आणि डेस्क् याच्यानी काय होणार आहे. गुणवत्ता पाहिजे गुणवत्ता आणि शेवटी शिक्षण विभागाचं जे काही विशेषत: महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाची जी वाटचाल आम्ही बघतो त्याच्यामध्ये सगळं गणित फिरत फिरत फिरत फिरत शेवटी टिचर्स ट्रेनिंग वरती येऊन थांबते आणि टिचर्सला ट्रेनिंग दया मग ते बघुन घेतील निदान काही नाही तर रिपोर्ट तर देतील. मग असं तर व्हायला नको होतं मग याच्यासाठी काय उपाययोजना करायच्या म्हणून लक्षात घ्या या ज्या NGO’S वेगळया वेगळया प्रोजेक्टच्या रुपाने या विभागात आलेल्या आहेत. आणि काय करतायत याचा अर्थ काय यांच्यामागे दृष्टिकोन काय हे समजून घेणे खूप गरजेचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे एकतर सरकारी नोकरी , सरकारी नोकरीत एक अंगभूत असा गंज चढतो मेंदूला. कारण सिक्युरिटी असते ना पगाराची सिक्युरिटी असते त्यामुळे गंज चढत जातो. नवीन कल्पना सुचायला आपोआपच काहीतरी बंधनं येत जातात. सृजनशीलता कमी होत जाते. कल्पकता कमी होत जाते. त्याच्यावर मात करायची तर त्याला गदागदा हलवलं पाहिजे. खळबळ उडाली पाहिजे आणि ते करण्यासाठी आमचं असं Observation होतं की ही जी आतली ऊर्जा आहे ही इतकी वर्ष सुप्तावस्तेत राहीलेली आहे. नुसती या विभागात नाही एकुणची गर्व्हमेंट मध्ये की त्याच्यासाठी बाहेरुन नविन चैतन्य्ा ओतावं लागेल. तुमच्या लक्षात येत असेल की ज्या NGOS इनव्हॉल्व झालेल्या आहेत. या बाजारू NGOS नाहीत किंवा पैसे कमवायला आलेल्या NGOS नाहीत ते काही इतर यापुर्वी काही प्रोजेक्टस राबविले गेले असतील तसे केवळ पैशाच्या देवाण घेवाणीतून काही तरी केल्यासारखं दाखवलं असं करणारे हे प्रोजेक्टस नाहीत. ही माणसं तळमळीनं काम करणारी आहेत. त्यांची निवड अतिशय काळजीपूर्वक केलेली आहे. त्यांच्या मॉडेलचा बारीक अभ्यास केलाय आणि एवढंच नाही तर ही मंडळी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये पॅशनेटली काम करतायेत पॅशनेटली व शब्द मी मुददाम वापरला कारण फार अवघड आहे. एखादया गोष्टीसाठी पॅशनेटली काम करणे फार अवघड आहे आणि अशी पॅनेटली काम करणारी मंडळी अशा NGO आवर्जुन निवडून आपल्या विभागाबरोबर काम करायला आल्या आहेत. किंबहुना त्यांना आणण्यात आले आहे. एक लिमिटेशन आहे बरं का हे ही मी थोडं स्पष्टपणे सांगतोय कि या NGO’S ना त्यांच्या विषयाशिवाय काहीच दिसत नाही. बाकी काही बघत नाही म्हणजे करडीपथला फक्त इंग्रजी शिक्षण एवढंच त्यांचं स्पेशलायझेशन आहे . ते त्या खिडकीतून विदयार्थ्याच्या गुणवत्ता वाढीकडे बघतात. एकलव्य्ा फक्त्ा विज्ञान शिक्षणातून गुणवत्ता वाढीकडे बघतात. आमचे साठे साहेब फक्त्ा चित्राच्या माध्यमातून गुणवत्ता वाढीकडे बघतात . लक्षात घ्या हि मर्यादा आहे त्याच्याबरोबरच हे बळ, हे लिमिटेशन्स आहे त्यांच्या बरोबरच ही स्ट्रेन्थ् आहे.कारण पुन्हा पहिल्या मुदयाकडे जाऊया विदयार्थ्यामध्ये काय गुणवत्ता असेल कुठल्याही क्षेत्रातली कशातली हे जाणून घ्यायला आपण सरकारी नोकर असल्यामुळे कित्येकदा मेंदूला चढलेल्या गंजामुळे ते लक्षात येत नाही पण ही मंडळी त्यातली तज्ञ आहेत. त्यांना त्यांच्या त्यांच्या शाळेतले काही विदयार्थी सापडू शकतात. ज्यांचं आयुष्य घडू शकतं आणि असा एक जरी हिरा घडला तरी या सगळया धडपडीचं चीज होऊ शकतं त्यांच्यामुळे हे एकच विषय घेऊन त्यात पॅशनेटली काम करणे हे त्या NGO चं लिमिटेशन पण आहे आणि स्ट्रेन्थ पण. विभाग म्हणून आपली जबाबदारी अशी आहे की त्याचा स्ट्रेन्थ् म्हणून कसा वापर करता येईल आणि तो वापर सुरु आहे हे मला नमुद करायला आनंद होतोय. खरोखर हे जाणवतय की हि स्ट्रेन्थ् वापरली जातेय मग गुणवत्ता वाढीसाठी हा एक प्रयोग हा एक उपाय आपण केला या सगळया NGO’S इनव्हॉल्व्ह केल्या आपल्यामध्ये ही तळमळ तयार झाली. काम सुरु झालेय ती रोल मॉडेल्स् आपल्यामध्ये फिरायला लागली ही NGOS ची लोक आपल्यामध्ये फिरायला आली काम करायला लागली त्याच्यातून एक नवी ऊर्जा नवीन वारं हे तयार झालं याची फळं दिसायला कदाचित वेळ लागेल. किंबहुना लागणारच आहे. मला तर नेहमी असं वाटते की ताबडतोब काहीना फरक दिसायला लागला तर प्रोसेस मध्ये गडबड आहे. काहीतरी प्रॉब्लेम आहे. वेळ हा लागणार give time हा घ्यायलाच पाहिजे .हे चुकिचं आहे, विदयार्थ्याला सुध्दा शिकवलं की, लगेच पुढच्या वेळेस तो घडाघडा बोलू लागेल म्हणजे ती पोपटपंची आहे. पण तो रात्री झोपला दुसऱ्या दिवशी दिवसभर खेळला आणि पुढच्या रात्री त्याने ते घडा घडा म्हणून दाखवलं तर त्याच्या ह्रदया पर्यंत पोचलं, पोपटपंची नाही. त्याच्यामुळे काही काळ लागणार आहे. आणी तो काळ जेव्हा सुरु होईल तेव्हा कदाचित मी या Dept.मध्ये नसेल वर्मा मॅडम या Dept. मध्ये नसतील पण मुलांसाठीचे हे प्रयोग आणि तुम्ही या Dept. मध्ये असाल. धिस युज युनिक अपॉच्युनीटी. हे पुन्हा पुन्हा घडून येत नाही मित्रानो.
आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा अशी संधी पण येत नाही ती संधी या कार्यालयामध्ये या निमित्ताने या नव्या विचारांच्या निमित्ताने उपलब्ध झाली आहे. ब्रेन स्ट्रॉर्निगचा जो उल्लेख केला म्हणून मी माझ्या मनातला दुसरा एक गोंधळ सांगतो जसं गुणवत्ता म्हणजे काय हा गोंधळ माझ्या मनात आहे तसा दुसरा एक गोंधळ आहे. ते आता एवढया NGOS काम करतायेत. कायापालट अभियान आलं नविन जी स्कीम आली आता काय फर्निचरच खरेदी करणार आहेत म्हणे, म्हणजे गुणवत्ता राहीली बाजूला आणि मुलांना झोपायला बेड आणी डायनिंग टेबल यांची चिंता व्हायची. हे जे वेगळे वेगळे नवीन प्रकार आणि प्रयोग आहेत हे करण्यामागे सुध्दा विभागचा एक दृष्टिकोन आहे. क्रेझ म्हणून काहीतरी करुन दाखवायचेय म्हणून किंवा सिंबॉल म्हणून काही केल जात नाही. हे आपण सगळयांनी समजून घेतले पाहिजे हे मी का बोलतोय कारण गुणवत्ता वाढीची ही जी प्रक्रीया घडत जाते ना ही आपण ही अनुभवले असेल की मी बहुतेकदा ९९ % किंवा ९५% म्हणून मी इनडयुव्हुजवल सेंटरीक असते म्हणजे त्या शाळेतला कोणीतरी एक अधिक्षक त्या शाळेतला कोणीतरी मुख्याध्यापक त्या शाळेतला कोणीतरी एक शिक्षक हा अतिशय एक्टीव्ह असतो. कदाचित दोघे किंवा तिघे एक्टीव्ह असतात आणि त्यांच्या भोवती ही सगळी गुणवत्ता वाढीची आणि शाळेची विकासाची प्रक्रिया फिरत असते काही कारणाने ते Individual तिघे बाजूला झाले की, सगळं थांबते. त्याची उदाहरणं आपल्याला माहीत असतील ,याच्यामुळे होतं काय त्या व्यक्तीचे महात्म्य प्रस्थापित होत की, ज्या व्यक्तीमुळे हे झालं नाहीतर नसतं झालं हे प्रस्थापित होतं. आपल्याला काय साधायचय आपल्याला विदयार्थ्याच्या गुणवत्ता वाढीचं इन्स्टयूटयूशनायझेशन साधायचंय. संस्थात्म्क रचना उभी करायचीय व्यक्ती कोणी असो. म्हणून गर्व्हनंस मधलं माझ एक लाडकं वाक्य्ा असं आहे. No body is indispendable including my self कोणीही अपरीहार्य नाही आणि कोणीही आलं की मी सुध्दा आलो, मी नसलो तरी मी जे म्हणतोय मला जे वाटतयं ते चालू राहिले पाहिजे तर ते इन्स्टियूटयुशनलायझेशन .ते साधण्याचा हा प्रयत्न आणि म्हणून जी कोणती अभियानं येतायेत किंवा ठुबे साहेबांनी काही नवीन त्यांच्या कल्पनेतून काही प्रकल्प्ा आणलेत, सुरु केलेत आणखी वेगळया प्रकल्पामध्ये आणखी वेगळया कल्पना राबविल्या जातायेत . या सगळया करतांना बारकाईने आमचं लक्ष आहे ते इनडयुव्हुजवल सेंटरींग आहे की, System सेंटरींग ,आजची जी कल्पना आहे आपल्या शिक्षण अभियानाची की मला हे अभिमानाने सांगावसं वाटते कि सिस्टीम सेंटरींग आहे. व्यक्तीवर अवलंबून नाही. त्याची गरज आहे आपल्या Dept.ला. आपल्या Dept. ला चांगले कर्मचारी, शिक्षक यांची तर गरज आहेच पण नुसतेच चांगला कर्मचारी, चांगल्या शिक्षकांची गरज नाही तर कर्मचारी शिक्षक कोणत्याही पातळीचे असोत ते चांगल्या पध्दतीने विदयार्थ्याना घडवतील अशा रचनेची गरज आहे. आणि तो प्रयत्न आपण आता करत आहोत. आणि म्हणून माझ्या मनातला जो दुसरा गोंधळ आहे तो जरा स्प्ष्टपणे मांडतो की, कुठलाही प्रकल्प राबवितांना कुठलही काम करतांना individual Centring का नसांव की सिस्टीम का असावं हा गोंधळ अनेक काळ अनेक वर्ष माझ्या मनात राहिल्यावर विचारांती या मुददयावर आलेलो आहे की काम हे सिस्टीम सेंटरींगच असायला पाहिजे. अमूक एक व्यक्तीमुळे ते घडतय असं होता कामा नये. सुरवातीला घडेल. पण ज्या व्यक्तीमुळे ते घडतय त्या व्यक्तीनेही हा विचार करायला पाहिजे की उदया मी नसलो तरी हे घडंल पाहिजे अशी सिस्टीम उभी राहिली पाहिजे. तिसरा जो माझ्या मनातला गोंधळ आहे तो जरा जास्तच गहिरा आहे आणि आपल्या विभागाशी जास्त्ा निगडीत आहे. तो म्हणजे आपण कोणाशी डील करतोय आपण आदिवासी विदयार्थ्याशी डिल करतोय. आदिवासी समाजाशी डील करतोय आणि त्यांची प्रगती त्यांचे मेन स्ट्रीमिंग मुख्य प्रवाहात त्यांना सामिल करुन घेण्यासाठी ची स्कील ते Lagage ते सगळं त्यांच्यामध्ये आणण्यासाठी आपली आख्खी शिक्षण व्यवस्था आपण वापरत आहोत. आम्ही हे मेन स्ट्रीमिंग करतांना त्यांच्या कल्चर कॉर्न्झवेशन बददल काय विचार करतोय आपण हा बॅलन्स् कसा साधणार आहोत म्हणजे करडीपथ मुळे आपण त्यांना इंग्रजीमध्ये तयार केलं पण त्याची जी मुळ बोलीभाषा आहे तिच्या Conservation साठी त्याच्या मनात आपण कोणते विचार टाकतो आहोत. जर आपण नाही करणार तर कोण करणार नाही तर आपण कसे नागरी समुह आपले जे मूळ जगणे आहे ते विसरुन एका भलत्याच वेस्टन स्टाईल लाईफ स्टाईलच्या मागे लागलो आहोत तसं त्यांना बनवणं हे आपलं उदिदष्ट आहे का आणि ते बनवणे योग्य आहे का हा डायलॉग नाही हा प्रॉब्लेम आहे. नक्की हे कसे अरावे हा प्रश्न सहजा सहजी न सुटणारा आहे. हा मी तुमच्यापुढे अशासाठी मांडला कि जेव्हा जेव्हा आपण त्यांचं मेन स्ट्रीमींग करु या विदयार्थ्याचा या स्पर्धेच्या युगात उभ राहण्यासाठी तयार करु त्याच बरोबर त्यांची ती ओरीजनेलीटी आहे ती गमावणार नाही याची काळजी आपणच घ्यायला पाहिजे ही आपली जबाबदारी आहे. त्यांचे मूळ विसरुन आपण जर त्यांना आपल्या सारखं बनवण्याच्य मागे लागत असू तर तिथही कुठतरी चुकतय आणि आपल्या सारख न बनवता त्यांनी मूळ आहे तसंच रहावे म्हणूनच फक्त प्रयत्न करणार असू तर ते ही चुकीचं आहे. कारण त्यांना सुध्दा अपॉर्च्युनिटी आणी संधी मिळावी. अपार्च्युनीटी आणी संधी हा जो मुददा आहे . भारतीय राज्य घटनेच्या प्रगतीची संधी त्यांनाही मिळाली पाहिजे या दोन्ही एक्सपीरियन्स्ला न जाता आपल्याला मधली कसरत साधायची आहे ही सगळी कसरत साधण्यासाठी जे अनेक उपक्रम आहेत.त्या उपक्रमामध्ये अशाप्रकारे एकमेकांना भेटणे. एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलने, एकमेकांचे प्रश्न ज्याला वियर्सलर्न शब्द वापरला त्या वियर्सलर्न मधनं एकमेकांचा विकास घडवून आणणे आणि त्याही पेक्षा महत्वाचे मी ज्या संधीचा आता फायदा घेतला की, आपल्या मनातले गोंधळ स्पष्टपणे मांडणे हे घडलं पाहिजे . आज या परिषदेच्या निमित्ताने राजूर प्रकल्प अधिकारी यांनी हा प्रयोग केला तर तीन महिण्यांनी असे एकत्र येतात तुम्ही हे एकूण मला खुप बरं वाटलं खरोखरंच अनेक ठिकाणी जी क्रेडेशन दिसतात गर्व्हमेंट मध्ये समाजामध्ये त्यात असे काही चांगले उपक्रम म्हणजे OASIS सारखे आणि या Oasis वरतीच तुमचं काहीतरी चांगलं घडतयं हे बघुनच मग उत्साह येतो आणि आपल्याला काम करायला मिळतं. आज इथं येऊन मला जो उत्साह मिळाला. मला हा उत्साह दिल्याबददल राजुर P.O. ठुबे साहेब आणि तुम्हा सर्वांचे आभार !