Indiaart Home

Khula Aasmaan

About Khula Aasmaan Why Khula Aasmaan What is Khula Aasmaan Comments & Testimonials Entries from locations Recognition Downloads

Art Contest

Regular Contest World of Mahatma Gandhi Contest Contest Results Prizes Shortlisted Child Artists Shortlisted Young Artists

Contest Themes

Videos & Audios

Videos Audios

Workshops, Exhibitions & Events

Other

Art on Postcard Articles & Write ups Blogs Khula Aasmaan Science Khula Aasmaan Photography

Reach Us

Home » Khula Aasmaan » Khula Aasmaan Science » Little Scientists » Essay by Poorva Shelke

Kitchen Science, essay by Poorva Shelke

Shortlisted science essay from Khula Aasmaan essay competition for children

Essay by Poorva Shelke, Prerana Madhyamik Vidyalay, Pune, Maharashtra

This science essay was part of the shortlist from Science Day essay contest for children.
This children's essay competition was conducted by Khula Aasmaan and Science Park, Pune.

स्वयंपाकघर म्हणजे ही एक प्रयोग शाळाच आहे. अनेक उपकरणे, रसायने यांनी समृद्ध आपण या प्रयोग शाळेत अनेक पदार्थ बनवतो. कळत नकळत आपण कित्येक विज्ञानिक क्रिया साधत असतो. एखादा पदार्थ उत्तमरित्या जमणं व बिघडणं यामागची कारणं ही वैज्ञानिकच असतात.

भाज्या, कडधान्ये, तेल,तुप, चहा, कॉफी, मसाले इत्यादी जिनसांसोबत शास्त्र प्रत्येक कृतीतील शास्त्र व विविध कृतीतील शास्त्र हेदेखील वैज्ञानिकच असतात. आहारातील रूचकपणा रोखून पदार्थातील पोषणमूल्ये वाढवणे व विविध उपकरणांतील नियंत्रण राखून काम उत्तमरित्या करणे हे देखील वैज्ञानिकच आहे.

समाधानाचा जन्म स्वयंपाकघरातच झाला असं म्हणतात. अन्न हे मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक आहे. म्हणून आपण रोज अन्न खातो. आहारातील चौरसपणा राखून व वापर करणे हे जितकं महत्त्वाचं आहे, तसेच अन्न कसं बनवलं व शिजवलं हे देखील महत्त्वाचं आहे. श्रीमती कमलाबाई सोहनी या भारतातील पहिल्या शास्त्रज्ञ आहे. त्यांनी स्वयंपाकातील विज्ञान काय आहे, कसे आहे हे जाणून घेतले. त्यांचे ‘स्त्री आहारगाथा’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. ‘स्त्री आहारगाथा’ या पुस्तकामुळे एक शास्त्रज्ञाचा स्वयंपाकघरात पाहण्याचा वेगळाच दृष्टिकोन आहे. त्यांनी नवीन व वेगवेगळे अनेक प्रयोग केले आहेत. कोणत्या पदार्थात काय टाकल्यावर काय तयार होते व ते कसे तयार होते, त्यात कोणत्या क्रिया होतात यांचा शोध लावला आहे.

पण नवल काय ते ? स्वयंपाकघर ही एक खरंतर प्रयोगशाळाच आहे. एखादा पदार्थ बनवण्यासाठी कच्च्या मालावर प्रक्रिया करून आकर्षक बनवणे वगैरे इत्यादीसाठी लागणारा कालावधी, उदा. किती तापमानातील क्रिया, किती काळ प्रक्रिया पदार्थ बनवण्यासाठी लागणार्‍या वेगवेगळ्या वस्तू, एखादा पदार्थ बरोबर बनवण्यासाठी लागणार्‍या योग्य व बरोबर प्रमाणात असलेल्या वस्तू. असल्यातरच पदार्थ उत्तम बनतो. वेगवेगळे प्रयोग करून पदार्थातील रंग, वास, गुणधर्म बदलतो. टेक्चर बदलतो. उदा. 1) आपण एक बटाटा घेऊ, त्याचे बारीक बारीक तुकडे करू 2) आपण बटाट्याचे तुकडे करून कुकरमध्ये वाफेतून काढू. 3) आपण बटाट्याच्या तुकड्यांना सोनेरी रंग येईपर्यंत तेलातून तळून काढू. 4) बटाट्याला शिजवू. वरील उदाहरणांपैकी आपण यापैकी कोणताही बटाटा खाऊन बघितला की आपल्या लक्षात असे येते की, प्रत्येक बटाट्याची चव, रंग, वास वेगवेगळा असतो.

स्वयंपाकघरातील विज्ञान वेगळे आहे. आपण तेथे वेगवेगळे प्रयोग काम करत असतो. कित्येक क्रिया आपण हाताळत असतो. नवीन नवीन साधनांचा वापर करत असतो. विविध कृतीतले प्रयोग करणे, पदार्थ उत्तम बनने हे देखील आपण वैज्ञानिक क्रिया-प्रक्रियांमधून करत असतो, बनवत असतो.

भारतातील पहिल्या श्रीमती कमलाबाई सोहोनी यांचा स्वयंपाकघरातील पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय वेगळा व छान होता.

Related Links :

Science Day essay contest results

Shortlisted essays from Science Day essay competition

Blog post - Khula Aasmaan Science is now live

Khula Aasmaan Science Contest Themes

Participate in Khula Aasmaan Science Contest

Related Links :

Science Day essay contest results

Shortlisted essays from Science Day essay competition

Blog post - Khula Aasmaan Science is now live

Khula Aasmaan Science Contest Themes

Participate in Khula Aasmaan Science Contest