Indiaart Home

Khula Aasmaan

About Khula Aasmaan Why Khula Aasmaan What is Khula Aasmaan Comments & Testimonials Entries from locations Recognition Downloads

Art Contest

Regular Contest World of Mahatma Gandhi Contest Contest Results Prizes Shortlisted Child Artists Shortlisted Young Artists

Contest Themes

Videos & Audios

Videos Audios

Workshops, Exhibitions & Events

Other

Art on Postcard Articles & Write ups Blogs Khula Aasmaan Science Khula Aasmaan Photography

Reach Us

Science Day essay contest

Khula Aasmaan Science

Science Essay competition to celebrate National Science Day

presented by Science Park & Khula Aasmaan

   Prize winning essay    Group B - 14 to 16 years    विज्ञान निबंध विषय : स्वयंपाकघरातील विज्ञान
नाव : पूर्वा चंद्रकांत खरचे
शाळा : प्रेरणा माध्यमिक विद्यालय, पिंपरी-चिंचवड, पुणे
जन्म तारीख : २१ मे २००५

आपल्याला माहितीये जसे की प्रत्येक गृहिणीला किंवा मुलीला आवडणारी जागा किंवा ठिकाण म्हणजे स्वयंपाकघर. भाजी छान झाली किंवा मीठ जास्त झालं या गोष्टींमागेसुद्धा विज्ञान दडलेले आहे. आपण म्हणतो की प्रयोग आपण विज्ञानखोली किंवा विशिष्ट जागेत अथवा ठिकाणात करतो किंवा प्रयोगशाळेत. पण आपली प्रयोगशाळा घरातच असताना असा विचार कशाला करायचा. ती प्रयोगशाळा म्हणजे आपले स्वयंपाकघर.

आजकाल आपण बघतो की, ‘ओल्ड आणि कोल्ड ' ची फॅशन आलीय. म्हणजेच की ओल्ड म्हणजे शिळे आणि कोल्ड म्हणजे थंड. यावरूनच शिळे खाल्ल्याने शरीरावर मोठा परिणाम होतो हे यावरून सिद्ध होते. तसेच आपण म्हणतो की जेवण मातीच्या किंवा तांब्याच्या भांड्यात बनवावे. मातीच्या भांड्यात जेवण बनवल्याने ते त्यात मातीचे भांडे बनवले असल्याने त्यात अनेक मिनिरल्स मिळतात त्यामुळे ते अधिक रूचकर व स्वादिष्ट बनते. यातच किती मोठा विज्ञानाचा धडा मिळाला. आपण स्वयंपाकघरात जे अन्न बनवतो त्याच्या मागेही विज्ञानच दडलेलेे आहे.

दूधाचे दही एका रात्रीत कसे होते याचा विचार आपण कधी केलाय ? तर आता आपण जाणून घेऊया. दुधात असणारे सूक्ष्मजीवांमध्ये फर्मेंटेशन ही प्रक्रिया घडून येताना दिसते ज्यामुळे हे शक्य झाले.

स्वयंपाकघर ही एक प्रयोगशाळाच आहे जसे की आपण म्हणतो पाणी कोणत्या पेल्यात ठेवावे. तर ते पाणी आपण चांदीच्या पेल्यात ठेवावे. जेणेकरून त्यात ऍन्टिऑक्सिडंट मिसळतात. त्यामुळे ते पाणी पिण्यास आरोग्यदायी असते. बघा म्हणजे स्वयंपाकघरातील प्रत्येक वस्तू ही विज्ञानाशी निगडित आहे.

आपण ढोकळा बनवताना त्यात हळद का टाकत नाही माहितेय ? कारण ढोकळ्यात खाण्याचा सोडा असल्याने त्यात हळद नसून आर्टिफिशियल कलर टाकतात. म्हणजे आम्ल व आम्लारी यांचे गुणधर्म आपल्याला यात दिसून येते. आपण शिजवलेले अन्न प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवू नये. त्यात ते अन्न जास्त काळ टिकत नाही.

आपण शिजवलेले अन्न त्याचवेळी खाऊन टाकले पाहिजे, नाहीतर ते जास्त काळ ठेवल्याने त्यातील न्यूट्रिअंटस् कमी होताना दिसतात. त्यामुळे शरीराची वाढ खुंटू शकते. बघा यातपण किती छान उदाहरण आहे. आपण पाणी उकळत असताना त्या भांड्यावर झाकण ठेवले तर काही वेळानंतर त्या झाकणावर आपल्याला पाण्याचे थेंब दिसतात. यामागचे शास्त्रीय कारण माहितीये काय आहे ? तर ते असे आहे की गरम वाफ ही थंड वाफेमध्ये मिसळली की त्यातून पाण्याचे थेंब निर्माण होतात.

आपल्याला हवेच्या दाबाचा अभ्यास करायचा असेल तर कुकर हे चांगले उदाहरण आहे. त्या कुकरमध्ये पाण्याला तापवतात व बाष्पीभवन घडून आल्यावर तेथे हवेचा दाब वाढतो व तीच हवा आपण शिट्टीच्या आधारे काढतो. त्यामुळे अन्न हे पाण्यात भिजवून ते कुकरमध्ये आपण सहजरित्या शिजवू शकतो.

आपल्याला डॉक्टर सल्ला देतात की काकडी ही सकाळी पोषक ठरते व रात्री घातक ठरते. आपण जे अन्न खातो त्यात टाकलेल्या मीठामुळे अन्नाला चव कशी काय येते ? याचा विचार किंवा यावर संशोधन केले आहे का ? तर त्याचे शास्त्रीय कारण असे की, मीठ हे खारट असल्याने ते त्या भाजांच्या ऍन्टिऑक्सिडंटमध्ये मिसळते व त्यामुळ ते अधिक रूचकर बनते.

वा ! म्हणजे आपल्या घरातील गृहिणी या स्वयंपाकघराच्या प्रयोगशाळेत वेगवेगळे प्रयोग करून आपण त्यांचा उपहास घेतो. यावरूनच असे लक्षात येते की विज्ञान हे फक्त बाहेरील जगात नसून ते आपल्या स्वयंपाकघरातही आहे असे दिसून येते. स्वयंपाकघरात गृहिणी विविध साधने व रसायनशास्त्राचा मेळ घालून नवीन काहीतरी करताना दिसून येते.

या प्रयोगशाळेत गृहिणी वेगवेगळी उपकरणे वापरून जे नवनवीन प्रयोग करतात ते नेहमी आपल्याला उपयुक्त ठरते. त्यामुळे स्वयंपाकघर ही गृहिणीसाठी प्रयोगशाळाच बनली आहे. त्या प्रयोगशाळेतील संशोधक या आपल्या गृहिणी आहेत. यावरूनच असे लक्षातयेते की स्वयंपाकघरातसुद्धा विज्ञान आहे व स्वयंपाकघर हे विज्ञान व विज्ञान हे स्वयंपाकघरासाठी बनलेले आहे असे दिसून येते. या स्वयंपाकघराचा आपल्या रोजच्य जीवनाशी फार मोठा संबंध आहे किंवा स्वयंपाकघर हा एक प्रयोग आहे असे मला वाटते.